Pregnancy Tips : 'प्रेग्नेंसी' मध्ये नोकरी-घर सांभाळताना उडते तारांबळ? प्रसन्न मन अन् सुदृढ तब्येतीसाठी 'या' टिप्स करतील मदत

Women Pregnancy Health Care : आजकाल महिला प्रेग्नेंसीमध्ये नोकरी करून घर सांभाळतात. अशात त्यांच्या तब्येतीकडे दुलर्क्ष होऊ नये आणि बाळाचे आरोग्य उत्तम राहावे. यासाठी खास टिप्स फॉलो करा.
Women Pregnancy Health Care
Pregnancy TipsSAAM TV
Published On

आई होण म्हणजे बाईचा दुसरा जन्म होय. अशावेळी गरोदरपणात महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हे ९ महिने महिलेच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असतो. मात्र आजकालच्या महिला प्रेग्नेंसीमध्येही घर सांभाळण्यासोबत काम करतात. अशात त्यांच्या तब्येतीची आबाळ होऊ नये आणि घर-नोकरी नीट सांभाळता यावी, यासाठी महत्त्वापूर्ण टिप्स फॉलो करा.

आहाराकडे विशेष लक्ष द्या

महिलांनी गरोदरपणात कितीही काम केल तर त्यांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जर तुमचे पोट भरलेले असेल तरच शरीराला ऊर्जा मिळेल आणि काम करण्यात उत्साह निमार्ण होईल. गरोदर महिलांचा सकाळचा नाश्ता सकस असावा. बाळाची योग्य वाढ होण्यासाठी पौष्टिक आहार खूप महत्त्वाचा आहे. कामाच्या गडबडीत जेवणाच्या वेळा चुकवू नये तसेच कामाला जाण्यापूर्वी नियमित हलका व्यायाम करावा.गरोदर महिलेचे शरीर हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. यामुळे प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी शरीरातील पाण्याची पातळी वाढवावी. कामाच्या गडबडीत पाणी पिणे विसरून जाऊ नये म्हणून मोबाईलमध्ये अलार्म लावा. तसेच प्रवासात भरपूर पौष्टिक नाश्ता आपल्या सोबत ठेवा. विविध फळांचा आस्वाद घ्या.

छोटे ब्रेक

महिलांनी गरोदरपणात कोणतेही काम करताना सलग करू नये. छोटे-छोटे ब्रेक घेणे गरजेचे आहे. कारण यामुळे थकवा कमी येतो आणि महिलांना त्रास होत नाही. तसेच ऑफिसमध्ये आठ तास बसून काम केल्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. यामुळे शरीराची हालचाल करणे गरजेचे आहे. ब्रेकमध्ये मित्रमैत्रिणींशी गप्पा मारल्याने मनाला देखील आनंद आणि शांती मिळते. घर आणि नोकरी सांभाळताना महिलेला दमल्याने अशक्तपणा येऊ शकतो. अशा वेळी कामाच्या दरम्यान तुमची आवडती कामे करा किंवा छंद जोपासा.

मानसिक आरोग्य जपा

प्रेग्नेंसीमध्ये तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहणे हे तुमच्यासाठी आणि बाळासाठी खूप महत्त्वाचे आहे. उत्तम मानसिक आरोग्यामुळे तुम्ही दीर्घकाळ काम करू शकता. तुम्हाला तणाव येणार नाही. प्रेग्नेंसीमध्ये ऑफिस असो वा घर कोणत्याही ताण-तणावापासून दूर रहावे. कामाचा ताण, चढाओढ बाळाला घातक ठरू शकते. यामुळे महिलांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. प्रेग्नेंसीमध्ये नकारात्मक भावनांना जागा देऊ नका. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडेल.

Women Pregnancy Health Care
Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

चांगली झोप

प्रेग्नेंसीमध्ये नोकरी आणि घर एकत्र सांभाळण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. कारण अपुऱ्या झोपेचा बाळावर आणि तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. दिवसभर चिडचिड होईल आणि त्यामुळे कामाचा ताण वाढेल. यासाठी दिवसाची सुरूवात प्रसन्न मनाने करावी म्हणजे संपूर्ण दिवस आनंदी जाईल. गरोदर महिलांनी रोज ८-९ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

प्रवासात काळजी

ऑफिसला जाताना आपली विशेष काळजी घ्या, घरातून थोडे लवकर निघा म्हणजे प्रवासात घाई होणार नाही. कितीही काही झाले तरी धावणे, घाईत चालणे टाळा. यामुळे रक्ताभिसरण जलद होऊन हृदयाची समस्या उद्भवू शकते. याचा बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. गर्दीची ठिकाण चालताना आणि खडबडीत रस्त्यावरून प्रवास करताना आरोग्याची खबरदारी घ्या.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Women Pregnancy Health Care
PM Matru Vandana Yojana: गरोदर महिलांसाठी विशेष योजना; मोदी सरकार देणार इतके हजार रुपये, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com