Darker Mehndi : गडद रंगेल मेहंदीचा रंग, नवरोबा होईल खुश! ट्राय करा 'हे' भन्नाट उपाय

Tips For Dark Mehndi Colour : मेहंदीमुळे स्त्रियांचे सौंदर्य खुलते. त्यामुळे बहुतेक महिलांना मेहंदी लावायला खूप आवडते. मेहंदी छान गडद रंगामध्ये रंगावी असे त्यांना वाटते. मेहंदीचा रंग खुलवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.
Tips For Dark Mehndi Colour
Darker MehndiSAAM TV
Published On

मेहंदी हा महिलांच्या साज श्रृंगाराचा एक भाग आहे. कोणताही सण, समारंभाला महिला उत्साहाने मेहंदी वाढतात आणि आपल्या नवऱ्याचे नाव लिहितात. नवऱ्यालाही बायकोच्या हातावरील मेहंदी पाहायला खूप आवडते. मेहंदीमध्ये त्याचा रंग खूप महत्त्वाचा असतो. असे म्हणतात की, मेहंदी जास्त रंगली म्हणजे नवऱ्याचे जास्त प्रेम असते. यासाठी महिला मेहंदी गडद रंगावी याच्या प्रयत्नात असतात.

मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी 'हे' उपाय ट्राय करा

  • हातावर मेहंदी लावून झाल्यावर त्यावर मोहरीचे तेल लावा. यामुळे कमी वेळात मेहंदीचा रंग गडद येईल. मेहंदी संपूर्ण काढल्यानंतर देखील ती रंगण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल लावू शकता.

  • तुम्ही जर घरी मेहंदी बनवत असाल तर मेहंदीच्या मिश्रणात चहापत्तीचे पाणी मिक्स करा. यामुळे मेहंदीला गडद रंग येईल.

  • मेहंदीचा रंग गडद येण्यासाठी ती लावून झाल्यावर १५ मिनिटांनी त्यावर लिंबाचा रस शिंपडा. असे केल्यास मेहंदी छान रंगेल.

  • सुकलेली मेहंदी पु्न्हा ओली केल्यास रंग त्वचेमध्ये छान मुरतो.

  • तुम्ही जर घरी मेंहदी बनवत असाल तर ती भिजवताना त्यात पानातील काथ टाका. यामुळे मेंहदीचा रंग गडद होईल.

  • हाताला मेंहदी लावल्यावर ती काढताना हाताला नारळ तेल लावावे आणि हातवर हात चोळायचे यामुळे सहजरित्या मेंहदी निघते आणि रंगही छान, गडद येतो. हातवर हात चोळल्याने उष्णतेमुळे मेंहदी रंगते.

Tips For Dark Mehndi Colour
Skincare Tips : तुमच्या सौंदर्यात भर घालणार फाटलेले दुधाचे पाणी, वाचा भन्नाट फायदे
  • मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी बाम हा रामबाण उपाय आहे. मेहंदी सुकल्यावर त्यावर बाम चोळावा. यामुळे होते.

  • मेहंदीचा रंग काळा होण्यासाठी तव्यावर लवंगा गरम करून त्याचा धूरावर मेहंदीचे हात धरा. ५ मिनिटे तरी हात तसाच ठेवा. काही वेळात मेहंदी खूप काळी होईल.

  • कापसाच्या साहाय्याने सुकलेल्या मेहंदीवर साखरेचे पाणी लावा. यामुळे मेहंदी हाताला दीर्घकाळ चिकटून राहिल आणि छान रंगेल.

  • मेहंदी लावण्यापूर्वी हाताला वॅक्स लावा. कारण यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. यामुळे मेहंदी अधिक काळ हातावर राहते आणि चांगली रंगते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Tips For Dark Mehndi Colour
Monsoon Hair Care : पावसाळ्यात केस गळतीपासून सुटका हवीय? 'हे' आंबट पदार्थ खाऊन पाहा, टक्कल होईल गायब

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com