Thyroid Symptoms : थायरॉईड असल्यास शरीर देते 'हे' ७ संकेत, सुरुवातीलाच ओळखा अन् उपचार सुरू करा

Thyroid Health : थायरॉईड ग्रंथीतील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास वजन, केस, त्वचा, पचन आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होऊ शकतो. थायरॉईडच्या समस्येची लक्षणे जाणून घेऊयात.
Thyroid Health
Thyroid SymptomsAI PHOTO
Published On: 
Summary

थायरॉईड ग्रंथीतील हार्मोन्सचे संतुलन बिघडते

सतत थकवा, वजनातील बदल, केसगळती ही थायरॉईडची सामान्य लक्षणे आहेत

थायरॉईडचे मुख्यतः दोन प्रकार असतात

आजकाल थायरॉईडची समस्या वाढताना दिसत आहे. थायरॉईड ही मानेच्या पुढील बाजूला असलेली छोटी ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया , शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके आणि ऊर्जेचा वापर नियंत्रित करणारे हार्मोन्स तयार करते. जेव्हा थायरॉईड ग्रंथी आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त हार्मोन्स तयार करते, तेव्हा शरीराच्या विविध कार्यांवर परिणाम होऊ शकतो.

थायरॉईडचे मुख्यतः दोन प्रकार

  • हायपोथायरॉईडिझम - थायरॉईड ग्रंथीतून आवश्यकतेपेक्षा कमी हार्मोन्स तयार होतात.

  • हायपरथायरॉईडिझम - थायरॉईड ग्रंथीतून आवश्यकतेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार होतात.

थायरॉईडचा त्रास असल्यास शरीरात दिसणारी ७ लक्षणे

अचानक वजन वाढणे- कमी होणे

थायरॉईड हार्मोन्सचा शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. हायपोथायरॉईडिझममध्ये चयापचयाची गती मंदावल्यामुळे वजन वाढू शकते. तर हायपरथायरॉईडिझममध्ये चयापचयाची गती वाढल्याने आहार व्यवस्थित असूनही वजन कमी होऊ शकते.

हृदयाचे ठोके वाढणे

थायरॉईड हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होत असल्यास हृदयाचे ठोके वेगाने पडू शकतात. काही वेळा हृदयाची धडधड जाणवणे, अस्वस्थ वाटणे किंवा हात थरथरणे अशी लक्षणेही दिसतात.

मासिक पाळी अनियमित होणे

महिलांमध्ये थायरॉईड हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होऊ शकतात. काही महिलांना पाळी जास्त प्रमाणात येणे, कमी येणे किंवा अनियमित होणे अशा समस्या जाणवू शकतात. गर्भधारणेवरही याचा परिणाम होऊ शकतो.

मानेच्या पुढील भागात सूज दिसणे

थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढल्यास मानेच्या पुढील भागात सूज किंवा गाठ दिसू शकते. याला गॉइटर (Goiter) असे म्हणतात. काही वेळा गिळताना त्रास होणे किंवा घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटू शकते.

बद्धकोष्ठता

थायरॉईडचा पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो. हायपोथायरॉईडिझममध्ये पचनाची गती मंदावल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तर हायपरथायरॉईडिझममध्ये वारंवार शौचास होणे किंवा जुलाब होण्याची शक्यता असते.

Thyroid Health
Memory Loss : सारखं काही ना काही विसरताय? सावधान! मेंदू देतोय 'या' गंभीर आजाराचा इशारा, दुर्लक्ष करू नका ५ लक्षणं

त्वचा कोरडी होणे

हायपोथायरॉईडिझममध्ये त्वचा कोरडी, खरखरीत आणि निस्तेज होऊ शकते. काही व्यक्तींना त्वचेवर खाज येण्याचाही त्रास होतो. हायपरथायरॉईडिझममध्ये त्वचा उबदार आणि ओलसर राहू शकते.

चिडचिड वाढणे

थायरॉईड हार्मोन्सचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. हार्मोन्स कमी असल्यास उदासीनता, निरुत्साह किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. हार्मोन्स जास्त असल्यास चिंता, अस्वस्थता आणि चिडचिड वाढू शकते.

थायरॉईडचा त्रास होण्याची कारणे कोणती?

  • शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करणे .

  • आहारातून आयोडीन खूप कमी किंवा जास्त प्रमाणात मिळणे.

  • कुटुंबात थायरॉईडचा आजार असण्याचा इतिहास.

  • गर्भधारणेनंतर किंवा प्रसूतीनंतर हार्मोन्समध्ये होणारे बदल.

  • काही औषधांचा थायरॉईड ग्रंथीवर होणारा परिणाम.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.