Thyroid Care Diet : थायरॉईड कायम राहिल कंट्रोलमध्ये, औषधांसोबतच रोज खा 'हे' सुपरफूड

Shreya Maskar

हळदीचे दूध

थायरॉईडच्या रुग्णांनी दररोज एक छोटा ग्लास हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये 'कर्क्युमिन' (Curcumin) नावाचा मुख्य सक्रिय घटक असतो, जो शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारण्यास मदत करतो.

Turmeric Milk | pinterest

अश्वगंधा

झोपण्यापूर्वी एक चमचा अश्वगंधा पावडर कोमट दुधासोबत घ्या. तुमची इच्छा असल्यास तुम्ही अश्वगंधाचे मूळ पाण्यात उकळून पिऊ शकता. यामुळे हार्मोनल असंतुलन सुधारण्यास मदत होते.

Ashwagandha | pinterest

तुळस

तुळस केवळ रोगप्रतिकारशक्तीच वाढवत नाही, तर थायरॉईडच्या समस्यांवरही उपचार करते. अर्धा चमचा कोरफडीचा रस दोन चमचे तुळशीच्या रसात मिसळून प्यायल्याने थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Tulsi | pinterest

दुधी भोपळा

थायरॉईडच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा खाणे सर्वोत्तम आहे. थायरॉईडच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी दुधी भोपळा खावा. दुधी भोपळा खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

Bottle Gourd | pinterest

काळी मिरी

काळ्या मिरीमध्ये पायपेरिन नावाचा घटक असतो, जो नैराश्यविरोधी गुणधर्म आहे. जे तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात. काळी मिरी खाल्ल्याने हाडांचे दुखणे देखील कमी होऊ शकते.

Black Pepper | pinterest

बेरी

थायरॉईड ग्रंथीचे योग्य कार्य चालण्यासाठी आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी आयोडीन, सेलेनियम, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन डी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हे घटक बेरी या पदार्थात असतात.

Berries | Canva

दही

दही शरीरातील आयोडीनची कमतरता मोठ्या प्रमाणात भरून काढते. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात, जे पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात. आतडे निरोगी असल्यास थायरॉईड हार्मोन्सचे योग्यरित्या शोषण होते.

Yogurt | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : तुम्हालाही वारंवार ॲसिडीटी होतेय? रोज खाणारे 'हे' पदार्थ पोट बिघडवण्यास कारणीभूत, वेळीच खाणे थांबवा

Acidity | pinterest
येथे क्लिक करा...