Shreya Maskar
बीन्समध्ये 'ऑलिगोसॅकराइड्स' नावाचे पचनास जड असलेले कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे पचनक्रियेदरम्यान पोटात गॅस निर्माण होतो. हा गॅस वाढल्यामुळे पोट फुगणे, पोटात दुखणे आणि ॲसिडिटीचा त्रास जाणवतो.
फुलकोबी किंवा ब्रोकोली या दोन्ही भाज्यांमध्ये रॅफिनोजचे प्रमाण जास्त असते. रॅफिनोज ही पचन न होणारी साखर आहे. जेव्हा आपण या भाज्या खातो, तेव्हा ही साखर न पचता थेट मोठ्या आतड्यात जाते. ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो किंवा पोट फुगल्यासारखे वाटते.
गहू आणि काही धान्यांमध्ये ग्लूटेन नावाचे प्रथिन जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे ग्लूटेन असंवेदनशीलता असलेल्या लोकांना गॅस होऊ शकतो. त्यामुळे गहू कमी खा किंवा टाळा.
कांदा हा जेवणातील खूप महत्त्वाचा पण सामान्य घटक आहे, ते शिजवून आणि कच्चे दोन्ही प्रकारे खाल्ले जाऊ शकतात. कांद्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो. कारण यात 'फ्रक्टन्स' (Fructans) नावाचे कार्बोहायड्रेट असते.
लसणामध्ये फ्रक्टॅन्स नावाचे घटक असतात, ज्यामुळे पोटातील पाचक रसांचे प्रमाण वाढते.जास्त प्रमाणात किंवा कच्चा लसूण खाल्ल्यास पोटाच्या आतील भागावर (अस्तर) थेट परिणाम होऊन जळजळ होते, त्यामुळे पचनाचे विकार किंवा ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते.
काकडी खाल्ल्याने काही लोकांना छातीत जळजळ होते आणि आंबट ढेकर येतात. कारण काकडीत 'कुकुरबिटासिन' नावाचे कडू संयुग आणि विशिष्ट प्रमाणात फायबर असते, हे घटक पचनाच्या प्रक्रियेत गॅस किंवा ॲसिडिटी वाढवू शकतात.
शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे, परंतु त्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होतो. जास्त प्रमाणात सोयाबीन खाणे टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.