Thyroid Diet Food: थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश

Hormone Balance: थायरॉईड नियंत्रणासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे. आयोडीन, सेलेनियम व अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ हार्मोन्सचे संतुलन राखून ऊर्जा, चयापचय व रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.
Hormone Balance
Thyroid Diet Foodgoogle
Published On

थायरॉईडची समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळते. थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय प्रक्रिया, ऊर्जा पातळी, शरीराचे तापमान आणि हार्मोन्सचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे काम करते. थायरॉईडचे कार्य बिघडल्यास हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझमसारखे आजार उद्भवू शकतात, ज्याचा थेट परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. अशा वेळी औषधोपचार आवश्यक असले तरी योग्य आहाराची भूमिका तितकीच महत्त्वाची असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

अनेकदा थायरॉईडच्या रुग्णांना त्यांच्या शरीरात आवश्यक पोषक घटकांची कमतरता असल्याची जाणीव होत नाही. थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती आणि त्यांचे योग्य रूपांतर होण्यासाठी आयोडीन, सेलेनियम, झिंक, लोह आणि काही जीवनसत्त्वे अत्यावश्यक असतात. योग्य प्रकारे आखलेला आहार शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतो, दाह कमी करतो आणि औषधोपचारांसोबत घेतल्यास एकूण आरोग्य सुधारण्यास हातभार लावतो.

Hormone Balance
Hair Fall Causes: केस गळती वाढतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, आजपासून घ्या असा आहार

PubMed Central मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, थायरॉईडच्या आरोग्यासाठी काही अन्नपदार्थ विशेष फायदेशीर ठरतात. समुद्री शैवाळ (Seaweed) हे आयोडीनचे नैसर्गिक स्रोत मानले जाते. आयोडीनमुळे थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती योग्य प्रकारे होते. सॅलड, सूप किंवा स्नॅक्समध्ये शैवाळाचा समावेश केल्यास थायरॉईडचे कार्य सुधारण्यास मदत होते.

अंडीही थायरॉईडसाठी फायदेशीर आहेत. अंड्यांमध्ये आयोडीन, सेलेनियम, बी जीवनसत्त्वे, कोलीन आणि उच्च प्रतीचे प्रथिन आढळते. हे घटक हार्मोन्सची निर्मिती, चयापचय नियंत्रण आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. सॅल्मनसारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स मुबलक प्रमाणात असतात. त्यात आयोडीन, सेलेनियम आणि व्हिटॅमिन डीही असते, जे ऑटोइम्यून थायरॉईड आजारांमध्ये अनेकदा कमी आढळतं.

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरीसारखी फळे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. ही फळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून थायरॉईड ग्रंथीचे संरक्षण करतात. त्याचबरोबर कॉर्टिसोल हार्मोनचे नियमन करण्यास मदत करतात, ज्याची पातळी वाढल्यास हायपोथायरॉईडीझमचा धोका वाढू शकतो. दही हे आयोडीन, प्रथिने आणि प्रोबायोटिक्सचे चांगले स्रोत आहे.

ऑयस्टर्समध्ये झिंक, लोह, आयोडीन आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. हे घटक T4 हार्मोनचे सक्रिय T3 मध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि चयापचय प्रक्रिया सुरळीत राहतात. मात्र थायरॉईडच्या रुग्णांनी काही अन्नपदार्थांपासून सावध राहणेही तितकेच गरजेचे आहे. अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट्सयुक्त अन्न शरीरातील दाह वाढवू शकते आणि हार्मोन्सचा समतोल बिघडवू शकते. तसेच आयोडीन आवश्यक असले तरी त्याचे अति सेवन थायरॉईडच्या कार्यावर विपरीत परिणाम करू शकते. त्यामुळे आयोडीनयुक्त मीठ, आयोडीनसमृद्ध अन्न आणि सप्लिमेंट्सचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

Hormone Balance
New Year 2026 Upay: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करा हे उपाय, संपूर्ण वर्षाची पिडा होईल दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com