Hair Fall Causes: केस गळती वाढतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, आजपासून घ्या असा आहार

Vitamin Deficiency Hair Loss: केस गळती वाढण्यामागे व्हिटॅमिन्स आणि खनिजांची कमतरता कारणीभूत ठरते. योग्य आहार घेतल्यास केस मजबूत होऊन नैसर्गिक वाढ सुधारते.
Hair Fall Causes: केस गळती वाढतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, आजपासून घ्या असा आहार
Published On

महिलांचे सौंदर्य त्यांच्या दिसण्यासोबत त्यांच्या केसांमुळेही खुलते. सध्या हिवाळा सुरु असल्याने अनेकांना केस कडक होण्याच्या गळण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण केस गळतीचे प्रमाण वाढले की त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं. शरीरातील काही महत्वाच्या जीवनसत्वांची कमी तुम्हाला टक्कल पडण्याच्या समस्येला सामोरे जायला भाग पाडू शकते. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

PMC मध्ये प्रकाशित झालेल्या एका सविस्तर अभ्यासानुसार शरीरात आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता असेल, तर केसांच्या वाढीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि केस पातळ होणे किंवा गळण्याच्या समस्या वाढतात.

व्हिटॅमीन A, D, E, B12, बायोटिन तसेच लोह, झिंक आणि सेलेनियमसारखी खनिजे ही केसांच्या मुळांना निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. या पोषक घटकांची कमतरता झाल्यास केस लवकर 'रेस्टिंग फेज'मध्ये जातात, त्यामुळे केस गळती वाढते आणि नव्या केसांची वाढ मंदावते.

Hair Fall Causes: केस गळती वाढतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, आजपासून घ्या असा आहार
Liver Cancer Symptoms: लिव्हर कॅन्सर झालास शरीराच्या 'या' बाजूस होतात वेदना, तज्ज्ञांनी दिली महत्वाची टीप

जीवनसत्त्व A हे केसांच्या पेशींची वाढ आणि विकासासाठी महत्त्वाचे आहे. ते टाळूला नैसर्गिक ओलावा देणाऱ्या सेबमच्या निर्मितीत मदत करते. मात्र याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास केस गळती वाढू शकते. गाजर, रताळी, पालक आणि भोपळा यांसारखे पदार्थ जीवनसत्त्व A चे चांगले स्रोत मानले जातात.

B मधील व्हिटॅमिन्स, बायोटिन आणि B12, केसांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. बायोटिनची कमतरता असल्यास केस ठिसूळ होतात, तर B12 मुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होऊन केसांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. अंडी, सुकामेवा, बिया आणि हिरव्या पालेभाज्या यामधून ही जीवनसत्त्वे मिळतात.

व्हिटॅमिन D हे केसांच्या मुळांच्या पुनर्निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. याची कमतरता असल्यास अलोपेशिया एरिएटा यांसारख्या केस गळतीच्या समस्या उद्भवू शकतात. सूर्यप्रकाश हा याचा नैसर्गिक स्रोत असून फोर्टिफाईड दूध, फॅटी फिश आणि अंडी यामधूनही व्हिटॅमिन D मिळू शकते.

व्हिटॅमिन E हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून टाळूवरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते आणि केसांच्या मुळांचे संरक्षण करते. बदाम, बिया आणि पालक यांसारखे पदार्थ नियमित आहारात घेतल्यास टाळूचे आरोग्य सुधारते आणि केसांच्या वाढीस मदत होते.

लोहाची कमतरता ही विशेषतः महिलांमध्ये केस गळतीचे एक प्रमुख कारण मानले जाते. लोह कमी असल्यास केसांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे केस गळती वाढते. लाल मांस, डाळी, पालक आणि फोर्टिफाईड सीरियल्स यामधून लोह मिळते. तर झिंक हे केसांच्या ऊतींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. भोपळ्याच्या बिया, हरभरे, काजू आणि संपूर्ण धान्यांमुळे झिंकची पातळी संतुलित राहते. ब्राझिल नट्स, समुद्री अन्न आणि धान्ये हे सेलेनियमचे चांगले स्रोत आहेत.

Hair Fall Causes: केस गळती वाढतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, आजपासून घ्या असा आहार
Green Chilli Halwa: हिरव्या मिरचीचा हलवा कधी खाल्लाय का? अंकिता लोखंडेने शेअर केली खास रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com