Green leafy vegetables: 'ही' हिरवी पानं ठेवतील तुम्हाला फिट आणि निरोगी; रोजच्या आहारात आजच करा या पालेभाज्यांचा समावेश

Leafy greens benefits: पालक, मेथी, मोहरीची पाने, पुदिना, कोथिंबीर, तुळस, कढीपत्ता आणि शेवग्याची पाने यांसारख्या हिरव्या पानांमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. रोजच्या संतुलित आहारात त्यांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास आरोग्यासाठी पोषण मिळण्यास मदत होते.
Green leafy vegetables
Green leafy vegetablessaam tv
Published On

निरोगी आणि संतुलित आयुष्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या आणि विविध प्रकारच्या हिरव्या पानांचा समावेश असणं महत्त्वाचं आहे. या पानांमध्ये जीवनसत्त्वं, खनिजं, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठीही त्यांचा फायदा होतो.

दररोजच्या आहारात या हिरव्या पानांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास, पचनक्रिया सुधारण्यास त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर पालेभाज्या

या पालेभाज्या शरीराला पोषण देण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचन व्यवस्थित ठेवण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यामुळे दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी त्यांचा आहारात समावेश करता येतो.

पालक

पालक हा आयर्न, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे A आणि C यांचा चांगला स्रोत आहे. पालक खाल्ल्याने शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यास मदत होऊ शकते. तसंच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही पालक उपयुक्त मानला जातो.

Green leafy vegetables
Bad cholesterol: फक्त या 6 पदार्थांचा करा दररोजच्या आहारात समावेश; नसांना चिकटलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढतील बाहेर

मेथीची पानं

मेथीच्या पानांमध्ये फायबरचं प्रमाण चांगले असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते. तसंच रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी फायदेशीर ठरू शकते. यातील फायबरमुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्येही मदत होऊ शकते.

मोहरीची पानं

मोहरीची पाने जीवनसत्त्व K आणि कॅल्शियमने समृद्ध असतात. त्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी त्यांचा फायदा होतो. याशिवाय हृदयाच्या आरोग्यासाठीही मोहरीची पानं उपयुक्त ठरू शकतात.

पुदिना

पुदिना शरीराला थंडावा देण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. विशेषतः उन्हाळ्यात पुदिन्याचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. पुदिन्याची चटणी, सरबत किंवा सलाडमध्ये त्याचा वापर करता येतो.

कोथिंबीर

कोथिंबीर जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला म्हणजेच डिटॉक्स प्रक्रियेला मदत करण्यासोबतच किडनीच्या कार्यासाठीही ती उपयुक्त मानली जाते.

तुळशीची पानं

तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी तुळशीचा उपयोग होऊ शकतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासही तुळस मदत करते.

Green leafy vegetables
Chutney For Cholesterol: नसांमध्ये घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचा थर साचतोय? रोजच्या आहारात फक्त 'ही' एक चटणी खा

कढीपत्ता

कढीपत्ता केवळ पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. तो पचनक्रिया सुधारण्यास आणि केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करू शकतो. शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठीही कढीपत्ता फायदेशीर ठरू शकतो.

शेवग्याची पानं

शेवग्याच्या पानांना अनेकदा ‘सुपरफूड’ असं म्हटलं जातं. यामध्ये जीवनसत्त्व C, कॅल्शियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि हाडांचं आरोग्य चांगले ठेवण्यास शेवग्याची पाने मदत करू शकतात.

Green leafy vegetables
High Cholesterol: हृदयाच्या नसांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळवेल ही लसणाची चटणी; बनवण्याची पद्धत आताच लिहून घ्या

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com