TMC Job Recruitment : ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, नर्स पदाच्या ७२ जागांसाठी भरती

Job Recruitment : ठाणे महानगरपालिकेत नर्स पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे.
TMC Job Recruitment
TMC Job RecruitmentSaam tv

Government Job :

सरकारी नोकरी मिळावी असे प्रत्येकाचं स्वप्न असते. आता सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणींसाठी ठाणे महानगरपालिकेने मोठी भरती काढलीये.

ठाणे महानगरपालिकेत नर्स पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. याबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.

TMC Job Recruitment
Maharashtra Government Jobs : राज्य सरकार या विभागात करणार मेगाभरती; ६७० पदे भरणार, परीक्षा कशी असेल?

यामध्ये नर्स या पदांच्या एकूण ७२ जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पदांकरिता उमेदवार हे १२ वी उत्तीर्ण असायला हवे. त्याचबरोबर GNM आणि बी.एस्सी नर्सिंग उत्तीर्ण असायला हवे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर

1. नोकरीचे ठिकाण

ठाणे (Thane) महानगरपालिका

2. अर्ज प्रक्रिया

जाहिरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकी इमारत सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग ,चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे

TMC Job Recruitment
Petrol Diesel Price Today (22 August): कच्च्या तेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या मुंबईतील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

3. शेवटची तारीख

29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी अकरा वाजता थेट मुलाखतीसाठी (Interview) उपस्थित रहायचे आहे .

4. शैक्षणिक पात्रता

  • बारावी पास

  • नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी पदविका

  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

5. वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे

TMC Job Recruitment
Gold Silver Price (21st August) : श्रावण महिन्यात सोन्याच्या भावात वाढ, चांदीचे दर जैसे थे; जाणून घ्या आजचा भाव

6. अनुभव

शासकीय निमशासकीय/ स्टाफ नर्सचा किमान ३ वर्ष अनुभव

7. पगार (Salary)

महिन्याला ३० हजार रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com