Maharashtra Government Jobs : राज्य सरकार या विभागात करणार मेगाभरती; ६७० पदे भरणार, परीक्षा कशी असेल?

Job Recruitment : लवकरच राज्य सरकारच्या जलसंधारण विभागात मेगाभरती सुरु होणार आहे. त्यासाठी तरुणांनी तयारीला लागायला हवे.
Maharashtra Government Jobs
Maharashtra Government Jobs Saam tv
Published On

Recruitment At Department of Water Conservation :

लवकरच राज्य सरकारच्या जलसंधारण विभागात मेगाभरती सुरु होणार आहे. त्यासाठी तरुणांनी तयारीला लागायला हवे. याबाबतची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब अराजपत्रित या संवर्गातील ६७० पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

Maharashtra Government Jobs
IBPS Clerk Job Vacancy : तरुणांसाठी खुशखबर ! बँकेत लिपिक पदांसाठी 4045 जागा रिक्त, कसा कराल अर्ज

1. सरकारने काय म्हटले?

त्यांनी असे म्हटले की, सरकारने (Government) याबाबत 21 सप्टेंबर 2021 नुसार जलसंधारण अधिकारी, गट ब या पदांचे सेवाप्रवेश नियम (Rules) अधिसूचित करण्यात आले होते. सदर भरती प्रक्रिया ही औरंगाबाद येथे नियुक्ती प्राधिकारी करणार आहेत. या अनुषंगाने आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समितीची स्थापना करण्यात आलेली असून सदर पदभरतीकरीता टाटा (Tata) कन्सलटन्सी सर्विसेस या कंपनीसोबत करारनामा करण्यात आला आहे.

Maharashtra Government Jobs
BMC Recruitment : नोकरीची सुवर्णसंधी! सरकारी आरोग्य खात्यात 'डीएनबी'साठी शिक्षक पदांची भरती, कसा कराल अर्ज?

2. किती गुणांची असेल परीक्षा

मागील काही वर्षांपासून याबाबतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठीची प्रक्रिया प्रलंबित होती. या अभ्यासक्रमास तात्काळ मान्यता देऊन परिक्षेसाठी वेळ निश्चित करुन पदभरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकांना प्राधान्य मिळेल. तसेच मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुध्दिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे असे ही श्री. राठोड यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com