Petrol Diesel Price Today (22 August): कच्च्या तेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या मुंबईतील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol Diesel Price Today 22th August 2023: आज कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल का?
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam TV

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आज वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतून दिलासा मिळू शकतो का हे पाहावे लागेल.

पेट्रोल डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे.

Petrol Diesel Prices
Gold Silver Price (21st August) : श्रावण महिन्यात सोन्याच्या भावात वाढ, चांदीचे दर जैसे थे; जाणून घ्या आजचा भाव

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली होती परंतु,पेट्रोल-डिझेलचे भाव हे जैसे थेच आहे. परिणामी आज कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं आहे का हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

ब्रेंट क्रूड $84.56 प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $80.81 वर व्यापार करत आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या बदलाचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. देशातील  ऑइल (Oil)  विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. जाणून घेऊया ४ महानगरातील पेट्रोल (Petrol) डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Prices
Atal Pension Yojana: उतारवयात पैशांची चणचण भासणार नाहीच! 210 रुपयांची गुंतवणूक करा; महिन्याला 5000 ची पेन्शन मिळवा, कसे ते जाणून घ्या

1. देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
Deepa Parab: तुझं असं सौंदर्य पाहून सारं रान झालं हिरवं

2. शहरानुसार किंमत कशी तपासायची?

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज तेल कंपन्या ठरवतात. शहरे आणि राज्यानुसार या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा. तर, BPCL ग्राहकांना डीलर कोड> 9223112222 नंबरवर पाठवावा लागेल आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत कंपनी तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पाठवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com