Valentine Day Gifts: हृदयातील गोष्टी ओठांवर आण्यासाठी 'या' सुंदर गिफ्टसची मदत घ्या

Happy Valentine Day : व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला असतो पण एक आठवडा आधीच सर्व डेज सुरू होतात त्याला व्हॅलेंटाईन विक असे म्हणतात.
Valentine Day
Valentine DaySaam Tv
Published On

Valentine Day Ideas: फेब्रुवारी महिन्यातील प्रेमाचे दिवस साजरे करण्यासाठी लव्हबर्ड्स एकमेकांना गिफ्ट देत असतात. त्यामुळे मार्केटमध्ये गिफ्टसचा नुसता गोंधळ पाहायला मिळतो.जरी व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला असतो पण एक आठवडा आधीच सर्व डेज सुरू होतात त्याला व्हॅलेंटाईन विक असे म्हणतात.

परंतु, बरेचदा आपल्या कामांमुळे आपल्या जोडीदाराला हवा तसा वेळ देता येत नाही. त्यामुळे आपल्या नात्यात दूरावा येतो. या काळात रोज डे,प्रपोज डे,चॉकलेट डे,टेडी डे, प्रॉमिस डे आणि किस डे हे प्रेमाचे दिवस प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना गिफ्ट देऊन मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Valentine Day
Valentines Day 2023 Gifts : 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरला देऊच नका 'या' भेटवस्तू, नात्यात येईल कटूता !

तुमच्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती असेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत हा व्हॅलेंटाईन विक साजरा करायचा विचार करत असाल तर या सर्व दिवसांसाठी गिफ्ट ची यादी आम्ही इथे दिलेली आहे.

7 फेब्रुवारी (रोज डे)

या विकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे(Rose Day). या दिवशी मुलं मुली एकमेकांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा देतात. जोडीदार (Partner), क्रश एकमेकांना गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. त्या दिवशी गुलाबाच्या फुलाचा रंग खूप महत्त्वाचा असतो. जर कोणी तुम्हाला लाल गुलाब दिले तर याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करते. जर गुलाबाचे फुल पिवळे असेल तर ते तुमच्या मैत्रीचे प्रतीक दर्शवते. जर तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुम्हाला पिवळे आणि लाल दोन्ही गुलाब दिले तर याचा अर्थ असा होतो की मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

Valentine Day
Valentine day Love Rashifal : 'या' राशीच्या लोकांना मिळेल सरप्राईज, जाणून घ्या 'व्हॅलेंटाईन डे' नुसार तुमचे लव्ह राशिफल

8 फेब्रुवारी (प्रपोज डे)

व्हॅलेंटाईन डे चा दुसरा दिवस प्रपोज डे असतो. या दिवशी लोक त्यांचे एखाद्या व्यक्तीबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. या दिवशी काही लोक त्यांच्या मनातील भावना समोरच्याला सांगून त्यांच्या नात्याची (Relation) सुरुवात करतात. जर तुम्हाला प्रपोज डेला जोडीदारासमोर तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी अंगठी खरेदी करून त्यांना अंगठी गिफ्ट करू शकता.

9 फेब्रुवारी (चॉकलेट डे)

या वीक मधील तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट (Chocolate) डे आहे. नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी,आंबट गोडपणा कमी करण्यासाठी जोडीदार या दिवशी एकमेकांना चॉकलेट देतात त्याने त्यांच्या नात्यात गोडवा येतो. तुमच्या जोडीदारांना त्यांच्या आवडीच्या चॉकलेटस गिफ्ट करू शकता किंवा चॉकलेट कलेक्शन गिफ्ट करू शकता.

Happy Valentine Day
Happy Valentine DayCanva

10 फेब्रुवारी (टेडी डे)

10 फेब्रुवारी हा टेडी डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी टेडी बिअर गिफ्ट करतात. सॉफ्ट टॉय किंवा टेडी बियर तुम्ही तुमच्या जोडीदारांना करू शकता.

11 फेब्रुवारी (प्रॉमिस डे)

या दिवशी जोडीदार एकमेकांना वचन देतात,की कोणत्याही परिस्थितीत ते तुमच्या सोबत असतील. त्यांचे नाते प्रामाणिकपणे पार पाडतील. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे तुमच्या जोडीदाराला सांगायचे आहे की ते त्यांच्या नात्यात एकनिष्ठ आहेत आणि आयुष्यभर या नात्यात राहण्याची इच्छा आहे. एखादी भेट वस्तू देऊन तुम्ही तुमच्या जोडीदारांना वचन दिल्याने ते अधिक सुंदर वाटेल.

Valentine Day
Valentine Day : गर्लफ्रेंडसोबत पहिलाच 'व्हॅलेंटाईन डे' आहे? तर 'या' खास भेटवस्तू नक्की गिफ्ट करा

12 फेब्रुवारी (हग डे)

व्हॅलेंटाईन विकचा हा सहावा दिवस हग डे म्हणून साजरा करतात. हा दिवस जोडीदार एकमेकांना मिठी मारून साजरा करतात.जेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात तेव्हा मिठी मारून सर्व काही समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचते. तुम्ही तुमच्या पार्टनरला एखाद्या सुंदर गिफ्ट घेऊन साजरा करू शकता.

13 फेब्रुवारी (किस डे)

व्हॅलेंटाईन डे च्या एक दिवस अगोदर हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस जोडीदारांना त्यांच्या हवाभावातून प्रेम व्यक्त करायचा असतो. या दिवशी तुमच्या जोडीदाराला स्पेशल गिफ्ट देऊन तुम्हाला हा दिवस साजरा करता येईल.

Valentine Day
Happy Valentine's Day : 'या' व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या पार्टनरला 500 रुपयात द्या, अनोख्या भेटवस्तू !

14 फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे )

14 फेब्रुवारी हा खास दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. पूर्ण एक आठवडा साजरा केल्यानंतर हा शेवटचा दिवस खूप खास असतो. हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आणि स्वतःसाठी एक कपल ड्रेस खरेदी करू शकता जे त्यांच्यासाठी खूप स्पेशल असेल.

या आठवड्याभरातील दिवस आपण एकाच दिवशी साजरा करुन आपल्या जोडीदाराला खूश करु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com