Valentine Day : गर्लफ्रेंडसोबत पहिलाच 'व्हॅलेंटाईन डे' आहे? तर 'या' खास भेटवस्तू नक्की गिफ्ट करा

असे कितीतरी लोक असतील त्यांचा रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर चा पहिला वेलेंटाइन डे असेल.
Valentine Day
Valentine DaySaam Tv
Published On

Valentine Day : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो त्यातील व्हॅलेंटाईन डे प्रियकर आणि प्रियसी आनंदाने साजरा करतात. असे कितीतरी लोक असतील त्यांचा रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर चा पहिला वेलेंटाइन डे असेल.

अशावेळी तुम्हाला हा दिवस कसा साजरा करायचा, प्रेयसीला काय भेट देयायची असे अनेक प्रश्न पडले असतील. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही मजेदार गिफ्टस सुचवणार आहोत ज्याने तुमची गर्लफ्रेंड इम्प्रेस होईल.

Valentine Day
Valentine Recharge Plan : 'व्हॅलंटाईन डे' ऑफर ! Vodafone च्या रिचार्जवर मिळतोय 5GB Data फ्री

1. अंगठी गिफ्ट करा

व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या प्रियसीला अंगठी गिफ्ट म्हणून देऊ शकता. मुलींना अंगठी खूप आवडते मग तुम्ही त्यांच्या आवडीनुसार एक सुंदर सोन्याची किंवा चांदीची अंगठी गिफ्ट करू शकता. हे त्यांच्यासाठी खूप खास गिफ्ट असेल. अंगठी तुम्हाला दागिन्यांच्या दुकानात सहज मिळते.

2. बॅग करा गिफ्ट (Gift)

तुमच्या या खास दिवशी तुम्ही तुमच्या प्रियसीला एक बॅग गिफ्ट करू शकता. ब्रॅण्डेड बॅग त्यांच्या आवडीनुसार खरेदी करून तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता. बॅग त्यांच्या रोजच्या वापरातील महत्त्वाची वस्तू आहे त्यामुळे त्यांना तुमचे गिफ्ट नक्की आवडेल.

Valentine Day
Valentine Daycanva

3. पेंडेंट गिफ्ट करा

हे गिफ्ट तुमच्या गर्लफ्रेंडला खूप जास्त आवडेल तसे हे तुमच्या बजेट मध्ये सहज मिळेल. पेंडेंट तुम्ही गोल्ड किंवा डायमंड मध्ये बनवून गिफ्ट करू शकता. मुलींना (Girl) असे पेंडेंट घालायला खूप आवडतात,जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही आर्टिफिशल पेंडेंट खरेदी करून त्यांना गिफ्ट देऊ शकतो

4. स्मार्टफोन (Smartphone) गिफ्ट करा

हा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही त्यांना स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. मुलींना फोन मध्ये कॅमेरा कॉलिटी चांगली पाहिजे,त्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला जर तुमचा बजेट मजबूत असेल तर आयफोन गिफ्ट करा. कमी बजेट मध्ये तुम्ही कोणताही स्मार्टफोन चांगल्या कॅमेरा कॉलिटी सोबत विकत घेऊ शकता,हे गिफ्ट तुमच्या गर्लफ्रेंडला नक्की आवडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com