Mango Jam: उन्हाळ्यात घरच्याघरी बनवा मँगो जॅम; वर्षभर टिकवण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Summer Special Recipe: चपाती किंवा ब्रेडसोबत झटकन खाता येईल असं ज्याम सुद्धा सर्वांनाच आवडत असेल. त्यामुळे आज जॅम कसं बनवायचं याची माहिती जाणून घेऊ.
Summer Special Recipe
Mango JamSaam TV

उन्हाळा सुरू होताच बाजारात विविध प्रकारचे आंबे आणि कैरी येतात. त्यामुळे फळांचा राजा आंबा वर्षभर खाता यावा यासाठी गृहिणी विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. कुणी आंबावडी तर कुणी आंबापोळी असे पदार्थ बनवतात. यात चपाती किंवा ब्रेडसोबत झटकन खाता येईल असं ज्याम सुद्धा सर्वांनाच आवडत असेल. त्यामुळे आज जॅम कसं बनवायचं याची माहिती जाणून घेऊ.

Summer Special Recipe
Traffic Jam In Pune: सुट्ट्यांमुळे वर्दळ वाढली, वाहनांच्या संख्येत वाढ; पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

1 कप कच्ची कैरी

2 रसाळ आणि गोड आंबे

2 कप ब्राऊन शुगर

1 चमचा बडीशेप

4 ते 5 वेलची

कृती

मँगो जॅम बनवताना आधी कैरी आणि नंतर आंबा शॉपिंग बोर्डवर बारीक चिरून घ्या. त्यानंतर दोन्ही आंबे एकत्र मिक्स करून घ्या. यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर टाका. तसेच फ्लेवरसाठी वेलची आणि बडीशेप यांची बारीक पूड मिक्स करा.

त्यानंतर हे सर्व मिश्रण गॅसवर मंद आंचेवर शिजवून घ्या. हे मिश्रण अगदी थोडं कमी होईपर्यंत शिवजून घ्या. त्यानंतर सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या. मिश्रण थंड झल्यवर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. काचेच्या बॉटलमध्ये भरलेलं जॅम अगदी 6 महिने तर आरामात राहतं.

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांना हा खाऊ तुम्ही देऊ शकता. अनेकदा घरात भाजी आवडीची नसली की लहान मुलं जेवण करत नाहीत. अशावेळी त्यांना चपाती जॅम दिले तरी ते आवडीने खातील.

Summer Special Recipe
Expensive Mango in World: हापूस न्हवे, 'या' देशातील आंबा आहे सर्वात महाग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com