Weight Losing : वजन कमी करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. जिम मध्ये जाणे, घरी व्यायाम करणे, जॉगिंग करणे,ग्रीन टी पिणे इत्यादी वेगवेगळ्या पद्धतीने लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून जर तुमचे वजन काहीही न करता कमी होत असेल तर आनंद व्यक्त न करता ही तुमच्यासाठी एक गंभीर समस्या असू शकते.
मधुमेह -
अनेक अहवालातून असे समोर आले आहे, की वजन कमी होणे हे मधुमेहाची सुरुवात होण्याचे हे एक सामान्य लक्षण आहे. टाईप टू मधुमेह जे अनिश्चित जीवनशैलीमुळे होते, त्यात झपाट्याने वजन कमी होते.
अशा वेळेस हाता-पायात मुंग्या येणे,अशक्तपणा, थकवा, वजन कमी होणे हे काही लक्षणे दिसतात. वेळेवर मधुमेह ओळखून आहारात बदल केल्याने वजन सामान्य होण्यास मदत होईल.
हायपरथायरॉईड -
थायरॉईडचे दोन प्रकार असतात त्यामधील हायपोथायरॉईड मध्ये वजन वेगाने वाढू लागते आणि हायपरथायरॉईड मध्ये वजन झपाट्याने कमी होऊ लागते.
नैराश्य, मानसिक -
तणावाने ग्रस्त असलेले लोक जेवणाकडे लक्ष कमी देतात त्यामुळे त्यांचे वजन कमी होऊ लागते. डिप्रेशन मध्ये असताना बहुतेक लोक जेवण करणे बंद करतात त्यामुळे शरीरात साठलेल्या चरबी ऊर्जा शोषून घेण्यास सुरुवात होते आणि परिणामी वजन कमी होऊ लागते.
पोषक तत्वांची कमी -
शरीरातील आवश्यक पोषकतत्वाचे प्रमाण कमी झाल्याने वजन झपाट्याने कमी होते. अनेक वेळा पोषक तत्वे योग्य प्रकारे न घेतल्यास मूत्रपिंड किंवा हृदय समस्या निर्माण होतात. संसर्गामुळे किंवा पोटाच्या आजारामुळे वजन कमी होऊ लागते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.