

सध्याच्या वाढत्या धावपळीमध्ये शरीराकडे लक्षच राहत नाही. ९ तास काम करुन मग दगदगीचा प्रवास करुन खूप थकायला होतं. त्यामुळे आपलं आपलं आपल्या शरीरातल्या बदलांकडे लक्षच राहत नाही. पण त्याचा फटका आपल्याला एकदाच बसतो. जो आयुष्यभर आपल्या लक्षात राहतो.
डॉक्टर म्हणतात, ब्लड प्रेशर, डायबेटीज, कॅन्सर यांसारखे आजार लवकर बरे होत नाहीत आणि ते जीवघेणे सुद्धा असतात. त्यात या आजाराची लक्षणे फारशी स्पष्ट दिसत नाहीत. कधीकधीही लक्षणे तुम्हाला रोजच्या खाण्यापिण्याच्या किंवा वातावरणातल्या बदलामुळे झाली असावीत असं वाटतं. पुढे आपण आतड्यांचा कॅन्सर कसा होतो? किंवा त्याची लक्षणे काय असतात? याबद्दल जाणून घेणार आहोत.
आतड्यांचा कॅन्सर मोठ्या आतड्यात तयार होतो. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणं स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे आपण ही लक्षण सुद्धा दुर्लक्षित करतो. पण तज्ज्ञांच्या मते काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं. त्यामध्ये अचानक वजन कमी होणं, सतत पोट फुगल्यासारखे वाटणं, शौचामध्ये रक्त दिसणं, शौचाच्या सवयींमध्ये बदल होणं आणि विश्रांती घेतल्यानंतरही थकवा न जाणे ही आतड्यांच्या कॅन्सरची महत्त्वाची चिन्ह असतात.
जीवनशैलीत काही बदल करून या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. त्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं, मद्यपान टाळणं, रोज व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं आणि ताण नियंत्रणात ठेवणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.