Heart attack symptoms: अचानक चक्कर, घाम आणि श्वास घेण्यास त्रास? हार्ट अटॅकपूर्वीची ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Silent heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असते. अचानक चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम आणि अपचनासारखी लक्षणं दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांनी सायलेंट हार्ट अटॅकबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Early signs of heart disease
Summer heart attack symptomsgoogle
Published On

हार्ट अटॅकमुळे दरवर्षाला अनेक बळी जातात. हार्ट अटॅक हा आजही जगभरातील प्रमुख मृत्यूंच्या कारणामधील एक आहे. मात्र अनेकदा शरीर आधीच काही संकेत देत असतं. पण लोक तब्येत बिघडल्यासारखी लक्षणं समजून दुर्लक्ष करतात. डॉक्टरांच्या मते, योग्य वेळी उपचार मिळाले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात.

अमेरिकेतील आरोग्य संस्था सीडीसीच्या माहितीनुसार, अमेरिकेत दर 40 सेकंदाला एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. दरवर्षी जवळपास 8 लाखांहून अधिक लोकांना हार्ट अटॅक येतो. यामध्ये सुमारे 6 लाख लोकांना पहिल्यांदाच झटका येतो, तर 2 लाख लोकांना पुन्हा हार्ट अटॅकचा सामना करावा लागतो.

Early signs of heart disease
Type 2 Diabetes: टाइप-2 डायबेटीसच्या रूग्णांसाठी आंबा ठरू शकतो फायदेशीर, अभ्यासात मोठा खुलासा

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पाचपैकी एक हार्ट अटॅक हा सायलेंट हार्ट अटॅक असतो. म्हणजेच, शरीरात नुकसान होत असतं पण त्या व्यक्तीला त्यावेळी स्पष्ट लक्षणं जाणवत नाहीत. डॉक्टरांनी काही महत्त्वाची लक्षणं सांगितली आहेत, जी दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं.

अचानक चक्कर येणं

अचानक डोकं हलकं होणं, चक्कर येणं किंवा तोल जाण्यासारखे वाटणं हे हार्ट अटॅकचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. हृदय व्यवस्थित रक्तपुरवठा करू शकत नसल्यामुळे अशी अवस्था निर्माण होऊ शकते. दृष्टी धूसर होणे किंवा भोवताल फिरत असल्यासारखे वाटत असेल तर तातडीने वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.

Early signs of heart disease
Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

श्वास घेण्यास त्रास होणं

व्यायाम करताना धाप लागणं सामान्य मानलं जातं. पण कोणतंही कारण नसताना अचानक श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत जडपणा जाणवणं किंवा आराम करतानाही धाप लागणे हे गंभीर लक्षण असू शकतं. काही वेळा छातीत दुखत नसतानाही श्वास घेण्याचा त्रास हार्ट अटॅकचा इशारा देऊ शकतो.

अपचनाची समस्या

सतत मळमळ होणं, अपचनासारखे वाटणं किंवा उलट्या होणं हे अनेकदा पोटाच्या समस्येशी जोडलं जातं. पण काही प्रकरणांमध्ये ही लक्षणं हार्टच्या समस्यांशी संबंधित असू शकतात. इतर लक्षणांसोबत अशी समस्या जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

अचानक थंड घाम येणं

उकाडा नसताना किंवा कोणतीही मेहनत न करता अचानक घाम येणं हेही धोक्याचे संकेत मानले जातात. शरीराला थंडी वाजल्यासारखं वाटणं, त्वचा चिकट होणं किंवा अचानक घाम फुटणं यामागे हृदयविकाराचा झटका असू शकतो.

Early signs of heart disease
Diabetes Symptoms: अचानक हे ५ बदल दिसले तर समजा शरीरात साखरेचं प्रमाण वाढलंय, वेळीच लक्षणं ओळखा

कोणतीही स्पष्ट लक्षणं न दिसणं

सर्वात धोकादायक बाब म्हणजे काही वेळा हार्ट अटॅकची कोणतीही ठळक लक्षणं दिसून येत नाहीत. यालाच सायलेंट हार्ट अटॅक म्हटलं जातं. अशा वेळी हृदयाचं नुकसान झालेलं असतं, पण व्यक्तीला त्याची जाणीवही होत नाही.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com