भारतात अनेक डायबेटीजने अनेक लोक हैरान आहेत. त्यांच्यासाठी स्टेम सेलन हे फार उपयोगाचे आहे. कारण, स्टेम सेलनं डायबिटीस गायब होतो. भारतातल्या डायबिटीस रुग्णांसाठी हा दिलासाच म्हणावा लागेल. मात्र, हा दावा खरा आहे का? स्टेम सेल प्रत्यारोपणामुळे डायबिटीस गायब होऊ शकतो का? हा विषय बऱ्याच जणांच्या आरोग्याचा आहे. डायबिटीस झाला की रुग्णाला खूप पथ्य पाळावे लागतात. गोड खायची इच्छा जरी असली तरी खाऊ शकत नाहीत. त्यामुळे हा दावा खरा आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.
यादम्यान मेसेजमध्ये काही दावे करण्यात आले ते पुढील प्रमाणे आहेत.
25 वर्षीय महिलेला एक दशकाहून अधिक काळ टाईप वन डायबिटीसचा त्रास होता. सुमारे अडीच महिन्यांच्या पेशी प्रत्यारोपणानंतर डायबिटीस आजार पूर्णपणे बरा झाला. हा दावा म्हणजे टाईप वन डायबिटीस रुग्णांसाठी संजीवनीच आहे. टाईप वन डायबिटीस हा एक जुनाट आजार आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, 2021 मध्ये जगभरात 90 लाख लोक टाईप वन डायबिटीसग्रस्त होते. यापैकी 20 लाख लोक 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. तरुणांना टाईप वन डायबिटीसचा धोका आहे. त्यामुळे स्टेमसेल नक्की काय आहे...? या उपचारामुळे कसं काय डायबिटीस गायब करणं शक्य आहे ते जाणून घेण्याआधी स्टेम सेल काय आहे हे आधी जाणून घेवू.
स्टेमसेल प्रत्यारोपण म्हणजे काय?
स्वादुपिंडाच्या खराब झालेल्या पेशी इन्सुलिन तयार करतात. मात्र या निरोगी व्यक्तींच्या पेशींनी बदलल्या जातात. पूर्वी यासाठी दात्याची आवश्यकता होती. नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या रोगांमुळे स्टेमसेल बदलल्या जातात.अशा प्रकारे स्टेम सेल प्रत्यारोपण करून उपचार करता येतो. त्यामुळे आपल्या देशात अशी ट्रिटमेंट शक्य आहे का...? हे तज्ज्ञांकडून जाणून घेतले आहे.
तज्ज्ञ डॉ.महेश पडसलगे, डायबेटोलॉजिस्ट म्हणाले, " स्टेमसेल प्रत्यारोपण टाईप वन डायबेटीजप्रमाणे कर्करोग बरा करू शकतो. तसेच स्टेमसेल प्रत्यारोपण अनेक रोगांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र जगभरात डायबेटीज स्टेम सेलच्या ट्रिटमेंटला मान्यता नाही. टाईप वन डायबेटीज स्टेमसेलमुळे बरा होऊ शकतो." साईड इफेक्ट काय होतात यावर सध्या रिसर्च सुरू 100 मधील 60 रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र, या स्टेम सेल ट्रिटमेंटला जगभरात मान्यता मिळालेली नाही. स्टेम सेल ट्रिटमेंटनं डायबेटीजवर उपचार करणं शक्य आहे असा चीनने दावा केलाय. मात्र, भारतात यावर अजून रिसर्च सुरू असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
Edited By: Sakshi Jadhav