Diabetes Symptoms : डायबिटीजमुळे आंधळे व्हाल? धूम्रपान, पथ्य न पाळणाऱ्यांना अधिक धोका?

Diabetes Diet Plan : डायबिटीज असेल तर अंधत्व येऊ शकतं, असा दावा करण्यात आला आहे. WHO च्या माहितीनुसार, डायबेटिक रेटिनोपॅथी हे डोळ्यांच्या विविध आजारांनंतर जगभरात अंधत्वाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे.
Diabetes Symptoms
Diabetes SymptomsSaam Digital
Published On

आता बातमी आहे व्हायरल मेसेजची...तुम्हाला डायबिटीज असेल तर अंधत्व येऊ शकतं...हे आम्ही म्हणत नाहीये तर असा दावा करण्यात आलाय...भारतात डायबिटीजचे अनेक रुग्ण आहेत...त्यामुळे खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

डायबिटीस रुग्णांसाठी हा धोक्याचा इशारा आहे...देशात डायबिटीसने पीडित असलेल्या 15 टक्के भारतीयांना रेटिनोपॅथीचा धोका असल्याचा दावा करण्यात आलाय...म्हणजेच थेट डोळ्यांवर परिणाम होऊन नजर कमी होते असं म्हटलंय...यामुळे रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय...हे खरं आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...मात्र, त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

डायबिटीज हा लाईफस्टाईलशी जोडलेला गंभीर आजार आहे. डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी खाणंपिणं, डायटवर लक्ष द्यायला हवं. ब्लड शुगरची लेवल वाढल्यामुळे रुग्णांना अंधत्व येतं.हा मेसेज व्हायरल होत असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली...घरातील एखादा रुग्ण तरी डायबिटीस असल्याचं आढळतो...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने रिसर्च केला...त्यावेळी आम्हाला WHO ने दिलेली माहिती मिळाली...WHO च्या माहितीनुसार, डायबेटिक रेटिनोपॅथी हे डोळ्यांच्या विविध आजारांनंतर जगभरात अंधत्वाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे...हा रोग झाल्यानंतर, दृष्टी गमावण्याचा धोका 50 टक्क्यांपर्यंत राहतो...असं तरीदेखील आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला...

Diabetes Symptoms
Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा अचानक मृत्यू; आतकंवाद्यांना घरात दिला होता आश्रय

व्हायरल सत्य

डायबिटीज हा रक्तवाहिन्यांचा आजार

डायबिटीज नियंत्रणात ठेवलं नाही तर रक्तवाहिन्यांना ब्लॉकेज येतात

डोळ्यांचा पाठीमागचा पडदा खराब होतो

डोळ्यात रक्तस्त्राव झाल्यास नजरेवर परिणाम होतो

उच्च रक्तदाबाचा त्रास आणि सतत धूम्रपान करणाऱ्यांना अधिक धोका

डायबिटीज जर कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तर डोळ्यांप्रमाणे अजून आजार वाढतात...जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही...त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी खाणंपिणं, झोपणं सगळी पथ्य पाळणं गरजेची आहेत...त्यामुळे आमच्या पडताळणीत डायबिटीसमुळे अंधत्व येतं हा दावा सत्य ठरला आहे.

Diabetes Symptoms
Supriya Sule : 'सरकार पॅनिक, फडणवीस गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो'; अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुप्रीया सुळेंनी सरकारवर डागली तोफ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com