World No Smoking Day : निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली ! या गोष्टींची काळजी घेतल्यास धुम्रपानला घालता येईल आळा

Smoking Side Effects : सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. सिगारेट आरोग्यासाठी वाईट आहे, हे सतत आपल्या सांगण्याचा प्रयत्न करतात.
Smoking Habits Affects Health
Smoking Habits Affects Healthsaam tv
Published On

How To Quit Smoking : सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. सिगारेट आरोग्यासाठी वाईट आहे, हे सतत आपल्या सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी जाहिराती, सिगारेटचे पॅकेट, चित्रपट गृह अशा वेगवेगळा माध्यमांची मदत घेतात.

मेडिकवर हॉस्पिटल, नवी मुंबईचे डॉ शिशीर शेट्टी, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट सांगतात, धूम्रपानासारखी वाईट सवय सोडणे हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक चांगला निर्णय म्हणून ओळखला जाऊ शकतो. तंबाखू सेवनावर मात करणे हे अधिक असू शकते, परंतु योग्य वेळी आणि योग्य प्रकारे ही सवय सोडल्यास निरोगी (Healthy), धूम्रपानमुक्त जीवन जगता येणे शक्य होते.

Smoking Habits Affects Health
Smoking Side Effects : फक्त सिगारेटच नाही तर त्याचा धूरही ठरु शकतो घातक !

1. तारीख निवडा :

धूम्रपान सोडण्यासाठी विशिष्ट तारीख निवडा आणि ती तुमच्या कॅलेंडरवर नोंद करायला विसरु नका. ही तुमच्या डोक्याची मानसिक (Mental) तयारी करण्यास नक्कीच मदत करेल.

2. पाठिंबा मिळवणे आवश्यक:

धूम्रपान सोडण्याच्या तुमच्या निर्णयाबद्दल तुमच्या मित्रांना, कुटुंबाला आणि प्रियजनांना कळवा. त्यांचे समर्थनाने आपल्यात अनेक बदल जाणवू शकतात. सपोर्ट ग्रुपमध्ये सामील होण्याचा किंवा आरोग्य सेवा प्रदात्याकडून किंवा समुपदेशकाकडून व्यावसायिक मदत घेण्याचा विचार करा.

Smoking Habits Affects Health
Habit Of Smoking : मुझे तो तेरी लत लग गई... टेन्शन आल्यावर तुम्हालाही स्मोकिंग करण्याची सवय आहे? या टिप्स फॉलो करा

3. ट्रिगर्स ओळखा:

परिस्थिती, भावना किंवा क्रियाकलापांकडे लक्ष द्या ज्यामुळे तुमची तंबाखू खाण्याची इच्छा निर्माण होते अशा गोष्टींची नोंद करायला विसरु नका. सामान्य ट्रिगर्समध्ये तणाव, विशिष्ट दिनचर्या यांचा समावेश होतो. एकदा तुम्ही तुमचे ट्रिगर ओळखल्यानंतर, ते टाळण्यासाठी किंवा प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी धोरण विकसित करा.

4. दिनचर्येत बदल करा :

धूम्रपान आणि काही क्रियाकलाप यांच्यातील संबंध तोडण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करा. जर तुम्ही जेवणानंतर (After meal) धुम्रपान करत असाल, तर ती सवय नवीन आरोग्यदायी क्रियाकलापाने बदला जसे की चालायला जाणे किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे.

5. पर्यायांचा शोध घ्या:

धुम्रपानाला आरोग्यदायी पर्यायांनी बदला जे तुमचे लक्ष विचलित करू शकतात. शुगर-फ्री गमीज चघळणे, भाज्या किंवा फळांचा आहारात समावेश करणे, भरपुर पाणी प्या किंवा तुम्हाला आवडणारा छंद किंवा क्रियाकलाप करायला विसरु नका.

Smoking Habits Affects Health
Effects of smoking on diabetes : मधुमेहींनो, सतत धूम्रपान करण्याची सवय आहे ? होऊ शकतात 5 गंभीर आजार !

6. सक्रिय राहा:

शारीरिक क्रियाकलाप केवळ लालसेपासून तुमचे लक्ष विचलित करण्यात मदत करत नाही तर तुमच्या मेंदूत एन्डॉर्फिन देखील सोडतात. नियमित व्यायाम करा, जसे की चालणे, जॉगिंग, सायकल चालवणे किंवा तुम्हाला आवडणारी इतर कोणतीही क्रिया. हे तणाव व्यवस्थापित करण्यात देखील मदत करू शकते.

7. विश्रांती घ्या:

श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान किंवा योग यासारख्या विश्रांती तंत्रांचा अभ्यास करा. या पद्धती तुम्हाला तणावाचे व्यवस्थापन करण्यात आणि तंबाखूची तलफ कमी करण्यात मदत करू शकतात.

8. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT) वापरा:

निकोटीन रिप्लेसमेंट उत्पादने जसे निकोटीन गम, पॅचेस, लोझेंजेस किंवा इनहेलर वापरण्याचा पर्याय योग्य राहिल.

9. सकारात्मक राहा:

धूम्रपान सोडणे हा एक प्रवास आहे आणि वाटेत अडथळे येऊ शकतात. सकारात्मक राहा, तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आणि कोणत्याही अडथळ्यांमुळे तुमचा संकल्प सुटणार नाही याची खबरदारी घ्या.

Smoking Habits Affects Health
Rutuja Bagwe : ऋतूजाचे फोटो पाहून म्हणाल ही मराठीची दीपिकाच !

10. स्वत:ला प्रोत्साहन द्यायला विसरु नका :

तुमच्या तंबाखुमुक्त प्रवासातील प्रत्येक टप्प्यातील यश साजरे करायला विसरु नका. तंबाखूमुक्त राहणाऱ्या प्रत्येक आठवड्यासाठी, महिन्यासाठी किंवा वर्षासाठी स्वत: ला काहीतरी खास भेट द्या. असे केल्याने तुम्हाला पुढील प्रवासासाठी आणखी प्रेरणा मिळेल.

धूम्रपानाचा त्याग करणे ही एक प्रक्रिया आहे ज्यासाठी दृढनिश्चय आणि संयम असणे आवश्यक आहे. तुम्हाला अतिरिक्त समर्थनाची आवश्यकता असल्यास, आरोग्यसेवा व्यावसायिक किंवा तंबाखू बंदीसाठी कार्यरत असलेल्या संस्थांशी संपर्क साधा. वचनबद्ध राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि निरोगी, धुम्रपानमुक्त जीवनाचा आनंद घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com