Smoking Side Effects : फक्त सिगारेटच नाही तर त्याचा धूरही ठरु शकतो घातक !

Bad Habits : धूम्रपानामुळे हृदयविकार, पक्षाघात, अगदी फुफ्फुसाचा कर्करोग असे गंभीर आजार उद्भवतात.
Smoking Side Effects
Smoking Side Effects Saam Tv
Published On

Health Issue : सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. सिगारेट आरोग्यासाठी वाईट आहे, हे सतत आपल्या सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी जाहिराती, सिगारेटचे पॅकेट, चित्रपट ग्रह अशा वेगवेगळा माध्यमांची मदत घेतात.

धूम्रपानामुळे हृदयविकार (Heart Attack), पक्षाघात, अगदी फुफ्फुसाचा कर्करोग (Cancer) असे गंभीर आजार उद्भवतात. WHO ने प्रकाशित केलेल्या एका अहवाानुसार रोज सुमारे 14 हजार लोक धूम्रपानामुळे आपला जीव गमावतात.

Smoking Side Effects
Health Tips : संध्याकाळी चूकूनही खाऊ नका 'ही' फळे, अन्यथा आमंत्रण द्याल अनेक आजारांना !

केवळ सिगारेट ओढणारेच नाही तर सिगारेट ओढणाऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्याही आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. याला पॅसिव्ह स्मोकिंग असे म्हटले जाते. हे देखील सिगारेट सारखेच आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे सिगरेटचा धूर शरीरात जाऊन हळूहळू आरोग्य नष्ट करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल संपूर्ण माहिती.

1. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय ?

बिडी, सिगार किंवा सिगारेटमधून बाहेर निघणार धूर विषारी असतो. याला धुराचे अवशेष असे म्हणाता येईल. हे त्वचा (Skin), केस (Hair) , कपडे , सामान, खोली, कार, कार्पेट आणि लहान मुलांच्या खेळण्यांना चिकटून राहते. सिगारेटचा धूर जेव्हा बाहेर निघतो तेव्हा धूर विषारी घटकांच्या संपर्कात येतात आणि केमिकल रिएक्शन होते. त्यामुळे हे अधिक जास्त धोकादायक बनते. म्हणून तुम्ही धूम्रपान करत नसाल तरीही सिगारेटमधून निघणाऱ्या धुरीच्या संपर्कात येऊ शकता. यालाच पॅसिव्ह स्मोकिंग असे म्हटले जाते.

Smoking Side Effects
Habit Of Smoking : मुझे तो तेरी लत लग गई... टेन्शन आल्यावर तुम्हालाही स्मोकिंग करण्याची सवय आहे? या टिप्स फॉलो करा

2. गर्भवती महिलांनी राहा सावध

गर्भवती महिलांवर सर्वात जास्त पॅसिव्ह स्मोकिंगचा परिणाम होतो. यामुळे गर्भात वाढणाऱ्या बाळावरही नकारात्मक परिणाम होतो. एका संशोधनात असे समोर आले की, स्मोकिंगमुळे गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या लंग्सच्या विकासात अडथळा निर्माण होतो आणि मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला श्वसनाचे आजार होऊ शकतो. अशा परिस्थितीत सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येणे टाळा.

3. रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करते

लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कमकुवत होते. त्यामुळे दमा, पुन्हा पुन्हा आजारी पडणे, निमोनिया, कानात संसर्ग यासारख्या समस्या उद्भव शकतात. त्यासोबतच स्वादुपिंड, किडनीसंबधित आजार , तोंडाचे आजार इत्यादी समस्या उद्भवू शकतात. तसेच घशाच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com