Health Tips : आपण अनेक प्रकारच्या फळांचे सेवन करतो. फळांविषयीची एक गोष्ट सगळ्यांना माहीत असेल. एकोणिसाव्या शतकापासून डॉक्टर आणि आपले पेरेंट्स यांच्या तोंडामधून तुम्ही ऐकले असेल की, फळ ही व्हिटॅमिन आणि खनिजांमधील सर्वात मोठे स्त्रोत आहे. त्याचबरोबर असे मानले जाते की दिवसांमधून दोन वेळा फळांचे सेवन केल्याने तुमचे स्वास्थ्य निरोगी राहू शकते.
वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन नियमित केले पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या अंगांना कुशलतापूर्वक काम करण्यासाठी फळे मदत करतात. सोबतच जुन्या आजारांच्या जोखीमला कमी करण्याचे काम करते. परंतु अनेक प्रकारच्या फायद्यांसाठी वेळेवर जेवण करणे आवश्यक असते तसेच, फळांचे सेवन देखील एका योग्य वेळेमध्ये केले जाते.
जेवण करण्याचा जसा एक आदर्श वेळ असतो त्याचप्रमाणे फळांचे सेवन करण्यासाठी देखील एक वेळ निश्चित केलेला आहे. त्यामुळे फळांमधील पोषक तत्वे शरीराला योग्य प्रमाणात मिळण्यासाठी तुम्हाला फळांचे नियमित आणि योग्य वेळेवर सेवन केले पाहिजे.
आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर वारा लक्ष्मी असं म्हणतात की, जंक फूडच्या तुलनेमध्ये फळांचे नियमित सेवन करणे हा एक चांगला विकल्प आहे. परंतु हे दीर्घकाळासाठी अजिबात चांगले नाही आहे.
चार वाजल्यानंतर फळे खाण्याची परवानगी का नाही ?
आयुर्वेदाप्रमाणे आपण सगळ्यांनी सूर्यास्तानंतर फळांचे सेवन केले नाही पाहिजे. फळे थंड आणि हलके जरी असले तरी, फळांमध्ये (Fruit) गोड आणि आंबट या दोन्हीही चवी असतात. अशातच जेव्हा तुम्ही चारनंतर फळांचे सेवन करता तेव्हा त्यांच्या थंड आणि हलक्या नेचरमुळे वात आणि कफच्या समस्या उद्भवतात.
1. पचनसंस्था आणि झोप होते डिस्टर्ब :
आयुर्वेदानुसार चारनंतर फळांचे सेवन केल्यास झोपेची समस्या आणि पचनसंस्थेवर प्रभाव पडतो. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भरपूर सारी फळे म्हणजेच एक प्रकारचे कार्ब असतात. याचा अर्थ असा होतो की त्यांना अगदी सहजरीत्या तोडले जाऊ शकते. फळांचे सेवन केल्याने ते आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतात आणि सोबतच फळांचे सेवन केल्याने आपली ब्लड शुगर (Sugar) लेवल वाढते. त्यामुळे झोपण्याआधी फळांचे सेवन केल्याने ब्लड शुगर तिचा स्तर वाढवून तुमची झोप खराब करू शकते. याशिवाय सूर्यास्तानंतर आपल्या शरीरामधील मेटाबोलिझमची गती हळू होते. त्याचबरोबर कार्बला पचवणे अवघड होऊन जाते. त्यामुळे कार्बचे सेवन नियमित वेळी केले पाहिजे.
2. दुधासोबत फळाचे सेवन करू नये :
फळांसोबत दूध (Milk), दही किंवा भाज्यांसोबत फळे नाही खाल्ले पाहिजे. डेरियुक्त पदार्थ आणि भाज्यांसोबत फळांचे सेवन केल्याने शरीरामध्ये विषारी पदार्थ निर्माण होतात. असं फळांचे योग्य पचन आणि पोषक तत्वांचे कमी अवशोषनामुळे होते. शरीरामधील विषारी तत्वांच्या उपस्थितीमुळे तुम्हाला इतर आजार जडू शकतात.
3. फळांचे सेवन करण्याची योग्य वेळ कोणती ?
फळांचे सेवन करण्याची योग्य वेळ सकाळी रिकाम्यापोटी असते. जेव्हा आपण रात्रीच्या वेळी सात ते आठ तास उपवास करून जेव्हा उठतो तेव्हा आपलं पोट पूर्णपणे रिकाम झालेलं असतं. सकाळच्या वेळी स्वस्थ भोजन केल्याने पोषक तत्वांच्या अधिक कुशलतेने अवशोषित करण्यासाठी मदत मिळते आणि मेटाबोलिझमला सुरुवात होते. फळांचे सेवन सकाळच्या व्यायामा आधी आणि व्यायामानंतर करणे चांगले असते. सूर्यास्तानंतर प्रोटीन आणि कमी जटील कार्बचे सेवन करने चांगले असते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.