Kalonji Seeds Benefits for Health : कलोंजीच्या सेवनाने अनेक गंभीर आजार होतील दूर, अशाप्रकारे करा सेवन !

Health Tips : आरोग्यासाठी सुद्धा कलोंजी फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
Kalonji Seeds Benefits for Health
Kalonji Seeds Benefits for HealthSaam Tv
Published On

Kalonji Seeds Benefits for Health : केस आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी कलोंजीच्या बियांचा वापर फायदेशीर आहे. कलोंजी औषध तत्वांनी युक्त असते. ते त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे.

आरोग्यासाठी सुद्धा कलोंजी फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर रोजच्या जेवणात कलोंजीचा समावेश करून तुम्ही हृदय आणि यकृत तर निरोगी राहील त्यासोबतच इतर गंभीर आजारही दूर होण्यास मदत मिळेल.

Kalonji Seeds Benefits for Health
Samosa Health Side Effects : अरेच्चा ! समोसा खाल्ल्याने जडू शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या

मिडल ईस्ट आणि साऊथ एशियन येथे पाककृतीत कलोंजीचा वापर करणे अतिशय कॉमन गोष्टी आहे. बडीशेप तुम्ही थेट मध किंवा पाण्यासोबत खाऊ शकता. तसेच,तुम्ही कलोंजी दही, स्मूदी,जाडे भरडे पीठ, दही,ब्रेड आणि करी या पदार्थात वापरून तुम्ही जेवणाची चव दुप्पट करू शकता. हेल्थलाइननुसार , कलोंजी खाण्याचे काही फायदे जाणून घेऊया.

1. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध

अँटीऑक्सिडंट्सचा सर्वोत्तम स्रोत म्हणून कलोंजीला समजले जाते.म्हणून तुम्ही कलोंजीचे आहारात समावेश करून अनेक गंभीर आजारा होण्यापासून स्वतःला वाचवू शकता. नियमितपणे कलोंजी खाल्ल्याने मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकाराचा (Heart-attack) धोका कमी होतो.

2. कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित राहते

शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेव्हल जास्त वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होतो म्हणून अशा वेळेस कोलेस्ट्रॉलची पातळी तीव्र होऊन,हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.या गंभीर आजारांपासून (Disease) दूर राहण्यासाठी कलोंजी खाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुमच्या रोजच्या आहारात नियमितपने कलोनजी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची लेव्हल कंट्रोल मध्ये राहते आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते.

Kalonji Seeds Benefits for Health
Diabetes Health Issue : 'या' 4 सवयी ठरतात तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत !

3. कर्करोगापासून (Cancer) बचाव करण्यासाठी

कॅन्सरविरोधी आवश्यक घटकांचे प्रमाण कलोंजीमध्ये मुबलक प्रमाणात आहे.अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक या गुणधर्मांनी कलोंजी परिपूर्ण असते.हे हानिकारक फ्री रडकिल्स नष्ट करून कर्करोगाची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी करते.

4. वेदनेपासून आराम मिळेल

अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी हे घटक कलोंजीत आढळतात.त्यामुळे कलोंजीचा तुमच्या आहारात समावेश करून तुम्ही सूज,दुखापत आणि वेदनापासून आराम मिळवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com