Effects of smoking on diabetes : मधुमेहींनो, सतत धूम्रपान करण्याची सवय आहे ? होऊ शकतात 5 गंभीर आजार !

फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलामुलींना आणि तरुणांनामध्ये देखील मधुमेहाची लक्षणे दिसून येतात.
Effects of smoking on diabetes
Effects of smoking on diabetesSaam Tv
Published On

Effects of smoking on diabetes : जगभरात अनेक लोकं मधुमेहाचे शिकार झाले आहेत. अशातच मधुमेह ही आताच्या काळात अतिशय गंभीर समस्या बनली आहे. फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलामुलींना आणि तरुणांनामध्ये देखील मधुमेहाची लक्षणे दिसून येतात. अशातच जर का तुम्हाला मधुमेह झाला असेल आणि तुम्ही धूम्रपान करत असाल. तर ते तुमच्या आरोग्याला अतिशय हानिकारक आहे.

मधुमेह म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढणे. मधुमेह या आजारामध्ये माणसाच्या रक्तामधील शुगरची लेवल कंट्रोलमध्ये नसते. मधुमेह या आजाराला जीवनशैलीचा एक भाग मानला जातो. कारण आपल्या जीवनशैली मधील काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

Effects of smoking on diabetes
Diabetes Control Tips : किचनमधील 'हे' 4 पदार्थ फायदेशीर ठरतील मधुमेहावर !

मधुमेह या आजाराचा वेळीस उपचार केला नाही तर तुम्हाला इतर काही आजार जडण्याची शक्यता असते. परंतु, मधुमेह या आजाराला योग्य प्रमाणात खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली बदलण्यामुळे नियंत्रित ठेवले जाऊ शकते. अशातच तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी फार नुकसान पोहचवू शकते. जाणून घेऊया त्याबद्दल

1. मधुमेहांनी धूम्रपान केल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आणि अनियंत्रित होऊ शकते. त्याचबरोबर ब्लड शुगर लेवल नियंत्रित करण्यास फार कठीण होऊन बसते.

2. मधुमेह असणाऱ्यांनी धूम्रपानाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. शरीरामध्ये ग्लुकोजच्या वाढत्या प्रमाणामुळे मधुमेह रोग्यांची स्थिती खराब होऊ शकते. धूम्रपान केल्याने ब्लड शुगर लेवल वाढू शकते.

Effects of smoking on diabetes
Effects of smoking on diabetescanva

3. त्याचबरोबर मधुमेहामध्ये स्मोकिंग केल्यास ग्लुकोजची लय भारी कमी किंवा जास्त होऊ शकते. यामुळेच तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होताना दिसतात. त्याचबरोबर हृदयाच्या समस्या देखील मधुमेह असणाऱ्यांना असते.

4. तुम्ही मधुमेहाचे शिकार असाल तर धूम्रपानापासून चार हात लांबच रहा. जर का तुम्ही सतत तंबाखू आणि धुम्रपानाचे सेवन करत असाल तर तुम्हाला हृदयाशी निगडित समस्या उद्भवू शकतात.

5. खरंतर सिगारेट मध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे तुमच्या रक्तामध्ये वेसल्स जमा होऊ लागते आणि याचा परिणाम सरळ तुमच्या हृदयावर होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे ही समस्या उद्भवू शकते.

6. त्याचबरोबर मधुमेह रोग्यांनी धूम्रपान केल्यास किडनीशी निगडित समस्या वाढू लागतात. एवढेच नाही तर डोळ्यांमध्ये इन्फेक्शनचा खतरा सुद्धा वाढू शकतो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com