Beauty Skin Care : चेहऱ्यावर सतत पिंपल्स येण्याचं कारण तुमचे हात आहेत; जाणून घ्या दोघांमधील कनेक्शन

Skin Care Tips : चेहऱ्यावरील पिंपल्स जाताजात नाहीयेत? म्हणजे पिंपल्सची समस्या तुमचे हात आणि त्यावर असलेल्या बॅक्टेरीयामुळे वाढली आहे.
Skin Care Tips
Beauty Skin CareSaam TV
Published On

अनेक मुली आणि मुलांच्या चेहऱ्यावर देखील पिंपल्स येत असतात. पिंपल्स एक किंवा दोन असतील तर गोष्ट वेगळी आहे. मात्र काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर सतत जास्त पिंपल्स येतात. पिंपल्स खुप जास्त प्रमाणात वाढल्यावर त्याने आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम होतो. चेहऱ्यावर काळे डाग सुद्धा वाढू लागतात.

चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास त्याचे कारण अनेक व्यक्तींना हार्मोंन्स असंतुलीत होणे असावे असं वाटतं. तसेच काही व्यक्ती असंही सांगतात की पोट खराब झाल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. मात्र पिपल्स येण्यामागे आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे आपले हात असतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Skin Care Tips
Skin Care Tips: ग्लोइंग त्वचा हवी आहे? मात्र 'या' लोकांनी चुकूनही मुलतानी माती चेहऱ्यावर लावू नये

चेहऱ्यावर सतत हात लावणे

आपल्या हातांनी आपण दिवसभरात अनेक आणि विविध गोष्टींना स्पर्ष करतो. दरबाजा, कामाचा लॅपटॉप, टेबल, खुर्ची अशा विविध गोष्टींना आपण स्पर्श करतो. काही व्यक्ती काम करता करता पदार्थ खातात. त्यामुळे अशावेळी आपण विविध गोष्टींसह नकळत चेहऱ्याला सुद्धा हात लावतो. अशा पद्धतीने सतत चेहऱ्याला हात लावल्याने आपली स्किन खराब होते.

त्वचेवर पिंपल्स येण्यास सुरुवात होते. आपण हात जेव्हा चेहऱ्यावर लावतो तेव्हा अनेक वस्तूंवरील बॅक्टेरीआ आपल्या हातांना चिकटलेल्या असतात. हेच बॅक्टेरीया थेट आपल्या चेहऱ्यावर उतरतात. नंतर चेहऱ्यावर असलेल्या स्पॉट्समध्ये सर्व जातात. त्यामुळे चेहरा खराब होतो.

चेहऱ्यावर बॅक्टोरीया पसरणे

आपला चेहरा आणि हवा यांमध्ये सुद्धा काही बॅक्टेरीया असतात. जेव्हा आपण चेहऱ्याला हात लावतो तेव्हा हे सर्व बॅक्टेरीया स्किनमध्ये प्रवेश करतात. हवेतील बॅक्टेरीया स्किनवर चिकटतात तेव्हा ते झपाट्याने पसरू लागतात. त्याने चेहरा सुजतो, रॅशेस किंवा पुरळ येतात आणि स्किन लाल पडते. यामुळे काही व्यक्तींना जास्त पिंपल्स येण्याची शक्यता असते.

ओपन पोर्स बंद होणे

आपल्या चेहऱ्यावर बारीक छिद्र असतात. या छिद्रातून तेल बाहेर येते. काही दिवसांनी तेल, बाहेरील धूळ आणि प्रदूषण यांमुळे आपले ओपन पोर्स बंद होतात. त्यामुळे यामध्ये पिंपल्स तयार होण्यास सुरुवात होते. तयार पिंपल्स काही व्यक्ती फोडतात आणि त्यामुळे त्यातील किटाणू अन्य स्किनवर पसरतात. तसेच त्याने आणखी जास्त पिंपल्स येतात.

Skin Care Tips
Beauty Skin Tips : 14 ऑगस्टला चेहऱ्यावर अप्लाय करा 'या' गोष्टी; दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्य दिनी स्किन हिऱ्यासारखी चमकेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com