Sitting Position Side Effects : जास्त वेळ एकाच ठिकाणी बसताय? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम, या सवयी आजच बदला

Bad Sitting Positions : चुकीच्या उठण्या-बसण्याच्या पद्धतीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना समोरे जावे लागते.
Sitting Position Side Effects
Sitting Position Side EffectsSaam Tv
Published On

Sitting Position Affect Lifestyle :

कामाच्या ठिकाणी किंवा घरात जर आपण एकाच ठिकाणी अधिक वेळ बसत असू तर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यासाठी आपल्याला शरीराची हालचाल करणे अधिक गरजेचे आहे. परंतु, चुकीच्या उठण्या-बसण्याच्या पद्धतीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना समोरे जावे लागते.

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या अभ्यासानुसार, १२ तासांपेक्षा जास्त वेळ बसल्याने आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तसेच जास्त वेळ बसल्याने आपले आयुष्य कमी होऊ शतते. अभ्यासानुसार दररोज २० ते २५ मिनिटे व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. बैठी जीवनशैलीमुळे आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात जाणून घेऊया  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. लठ्ठपणा

जास्त वेळ एकाच जागी बसल्याने तुमचे वजन वाढू शकते. शरीर अॅक्टिव्ह नसल्यामुळे कॅलरीज बर्न होत नाही. त्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. लठ्ठपणा हा गंभीर आजार आहे.

Sitting Position Side Effects
Mental Stress : मानसिक त्रासामुळे सतत चीडचीड होते? डोक्यात नकारात्मक विचार येतात, या टिप्स फॉलो करा

2. हृदयरोग

एकाच ठिकाणी बसल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो. शरीरिक हालचालीच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात चांगल्या कोलेस्टेरॉलची कमतरता असते आणि खराब कोलेस्टेरॉल तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो.

3. मधुमेह

व्यायामाअभावी आपले शरीर साखरेची पातळी नियंत्रित करता येत नाही. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने मधुमेहाचा आजार जडू शकतो. तसेच तुम्ही लठ्ठपणाचे (Obesity) शिकार होऊ शकता.

Sitting Position Side Effects
Low Blood Pressure : अचानक शरीरातील ब्लड शुगर कमी झालं? लो बीपीचा त्रास नाही ना, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष नकोच!

4. उच्च रक्तदाब

शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयाच्या धमन्या मोठ्या होतात. ज्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा हृदयाला पुरेशा प्रमाणात होत नाही. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.

5. काळजी कशी घ्याल?

  • सकाळी किमान ३० मिनिटे तरी चालणे आवश्यक आहे.

  • ऑफिसमध्ये काम करताना ५ ते १० मिनिटांचा ब्रेक घ्या.

  • दररोज २५ ते ३० मिनिटे व्यायाम करा. तसेच शारीरिक हालचाली करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com