Side Effects Of Turmeric Milk : धोक्याची घंटा! रात्री झोपताना हळदीचे दूध पिण्याची सवय आहे? होऊ शकतो लिव्हर-किडनीवर गंभीर परिणाम

Turmeric Milk Disadvantage : अनेकांना रात्री झोपताना हळदीचे दूध पिण्याची सवय आहे. यामुळे झोप शांत लागते किंवा छातीत जमलेला कफ वितळण्यास मदत होते असे म्हटले जाते.
Side Effects Of Turmeric Milk
Side Effects Of Turmeric MilkSaam tv
Published On

Liver Kidney Damage : स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांची चव वाढते ती हळदीमुळे. आयुर्वेदात मोठं मोठ्या आजारांवर बहुगुणी ठरते हळदी. हळदीचा वापर केवळ मसालाच म्हणून नाही तर आयुर्वेदिक औषध देखील आहे.

अनेकांना रात्री झोपताना हळदीचे दूध पिण्याची सवय आहे. यामुळे झोप शांत लागते किंवा छातीत जमलेला कफ वितळण्यास मदत होते असे म्हटले जाते. हवामानातील बदलामुळे जेव्हा आपल्याला सर्दी- खोकला, ताप किंवा इतर अनेक दुखापत होते तेव्हा हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. ते दूध प्यायल्यावर लगेच आराम मिळतो. हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आपण लगेच बरे होतो.

Side Effects Of Turmeric Milk
Detox Drink: असे बनवा डिटॉक्स वॉटर, सुटलेलं पोट आठवड्याभरात झरकन कमी होईल

परंतु, ही हळदी (Turmeric) प्रत्येक व्यक्तीला फायदेशीर ठरेल असे नाही. यामध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्यांनी चुकूनही हळदीच्या दूधाचे (Milk) सेवन करु नये. ज्यामुळे त्यांची किडनी आणि लिव्हर निकामी होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी हळदीचे दूध पिणे टाळावे.

1. ऍलर्जी

ज्या लोकांना कोणतेही गरम पदार्थ खाल्ल्यानंतर ऍलर्जी होते त्यांनी कधीही हळदीच्या दूधाचे सेवन करू नये. याचे कारण म्हणजे हळदीचा प्रभावही उष्ण असतो. अशा प्रकारचे दूध प्यायल्याने ऍलर्जी होऊ शकते.

Side Effects Of Turmeric Milk
Benefits of Rubbing Nails : नखांवर नखे घासण्याची सवय आहे? फायदे वाचाल तर ही सवय कधीच सुटणार नाही

2. अशक्तपणा

ज्या लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिन (Hemoglobin) आणि लोहाचे प्रमाण कमी आहे त्यांनी हळदीचे दूध पिऊ नये. कारण दूध प्यायल्याने शरीरात लोह शोषले जात नाही, ज्यामुळे हिमोग्लोबिन तयार होऊ शकत नाही. अॅनिमियाचा त्रास असलेल्यांनी हळदीचे दूध पिऊ नये.

3. यकृताची समस्या

यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्यांना हळदीचे दूध प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसान होते. हे प्यायल्याने यकृताचा आजार वाढू शकतो, त्यामुळे ते जितके टाळतील तितके त्यांच्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरेल.

Side Effects Of Turmeric Milk
Turtiche Fayde: त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे तुरटी, फायदे वाचाल तर रोज वापराल

4. किडनीचा त्रास

संशोधनानुसार असे समजून आले आहे की, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे घटक असून त्यात ऑक्सलेट मोठ्या प्रमाणात आढळतात. या ऑक्सलेट्समुळे शरीरात किडनी स्टोनचा धोका वाढून किडनी निकामी होण्याचे संभवता अधिक असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com