Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Shukra rashi parivartan update : शुक्र ग्रह जुलै महिन्यातील ७ तारखेला मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम ३ राशींवर होणार आहे. या राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार, यशाचा मार्ग गवसणार
Shukra Gochar 2024saam Tv
Published On: 

नवी दिल्ली : शुक्र ग्रहाला शुभ मानलं जातं. वैदिक ज्योतिष शास्त्रात या ग्रहाला ऐश्वर्य-वैभव, भौतिक सुख, कला , सौंदर्य, वैवाहिक आनंदाचा ग्रह मानला जातो. या ग्रहाचा राशीवर मोठा परिणाम होतो. रविवारी ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ४ वाजून ३९ मिनिटाला शुक्रदेव बुधच्या मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याचा सर्व राशीवर परिणाम होणार आहे. तर ३ राशींवर मोठा परिणाम होणार आहे. या ३ राशी कोणत्या? जाणून घेऊयात.

४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार, यशाचा मार्ग गवसणार
Rashi Bhavishya : कुटुंबातील ताणतणावात वाढ होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी कर्क राशीमध्ये शुक्र गोचर फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामात लाभ होईल. उत्पन्नात मोठी वाढ होईल. आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित लोकांना परदेशी चलन मिळेल. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरदार वर्गाच्या कामात प्रगती होईल.

तूळ राशी

कर्क राशीमध्ये शुक्र गोचर तूळ राशीसाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला अप्रत्यक्षपणे धन प्राप्ती होईल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. तुम्ही दुसऱ्यांना दिलेलं कर्ज पुन्हा मिळेल. व्यवसायातील भागिदारी मजबूत होईल. व्यवसायात केलेल्या श्रमाचा फायदा होईल. मान-सन्मान वाढेल. जुन्या आजारांपासून सुटका होईल. जीवनात बायकोची चांगली साथ मिळेल. कुटुंबातील एकता वाढेल.

मकर राशी

कर्क राशीतील गोचरमुळे त्याचा मकर राशीवर सकारात्मक परिणाम होईल. नव्या व्यावसायिक संधी मिळतील. तुमची व्यवसायात भरभराट होईल. वडिलोपार्जित संपत्ती, घराचे वाद मिटतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशवारीची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. प्रेमी जोडप्याच्या आयुष्यांच्या मोठा बदल होईल. तसेच प्रेमी जोडप्यांच्या नात्यात गोडवा निर्माण होईल.

४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार, यशाचा मार्ग गवसणार
Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांना मिळणार कष्टाचं फळ

डिस्क्लेमर : लेखात दिलेली माहिती हिंदू धर्मातील ज्योतिष शास्त्राच्या आधारावर देण्यात आली आहे. या लेखातील गोष्टींना 'साम टीव्ही' दुजोरा देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com