ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्याचा शुभ अशुभ परिणाम पाहायला मिळतो. शुक्र ग्रह हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो.
३० नोव्हेंबरला शुक्र ग्रहाचे तुळ राशीत संक्रमण झाले आहे. शुक्र हा वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, भौतिक, सुख, विलास आणि प्रेमाचा कारक आहे. जेव्हा जेव्हा शुक्र आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर आणि राहणीमानावर होईल. तुळ राशीचा स्वामी शुक्र असल्याने हे संक्रमण विशेष असणार आहे. या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घेऊया.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. मेष
मेष राशींसाठी शुक्राचे संक्रमण खूप फायदेशीर असणार आहे. करिअर (Career) आणि व्यवसायात यश मिळेल. पार्टनरशीपमध्ये (Partner) फायदा होईल. आर्थिक लाभ होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. वाद घालणे टाळा.
2. कर्क
शुक्राचा राशी बदल कर्क राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरु शकतो. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. नवीन घरात (Home) शिफ्ट होऊ शकता. नवीन कार खरेदी करु शकता. मान सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल.
3. मकर
नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. हे संक्रमण बक्कळ पैसा देईल. कौतुकांचा वर्षाव होईल. उत्पन्न वाढू शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. लग्नाची बोलणी होतील. कौटुंबिक वादाला सामोरे जावे लागेल.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.