Shravan 2024 : पहिल्या सोमवारी वाहावी कोणती शिवामूठ? व्रत करताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी, मिळेल आयुष्यात यश

Shivamuth Puja : श्रावण महिन्याची चाहूल लागली असून सर्वत्र आनंदाचा, उल्हासाचा, भक्तीचा माहोल निर्माण झाला आहे. पहिल्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी आणि व्रत करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात जाणून घ्या.
Shivamuth Puja
Shravan 2024 SAAM TV
Published On

यंदा श्रावणी सोमवार महिना ५ ऑगस्ट पासून सुरू होत आहेत. या महिन्यात पाच सोमवार आले आहेत. श्रावणी सोमवारात शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते. ही पूर्वीपासून चालत आलेली धार्मिक परंपरा आहे.

५ ऑगस्ट पहिला सोमवार : शिवामूठ तांदूळ

१२ ऑगस्ट दुसरा सोमवार : शिवामूठ मूग

१३ ऑगस्ट तिसरा सोमवार : शिवामूठ मूग

२६ ऑगस्ट चौथा सोमवार : शिवामूठ जव

०२ सप्टेंबर पाचवा सोमवार : शिवामूठ हरभरा

श्रावणी सोमवारी उपवास करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • श्रावणी सोमवारी उपवासाला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून देवघर स्वच्छ करावे.

  • उपवासाच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे.

  • उपवासाच्या दिवशी पौष्टिक फलाहार घ्यावा. तसेच यात ड्रायफ्रूट्स आणि दुधाचा समावेश असावा.

  • विधिवत शंकराची पूजा करावी.

  • या दिवशी महादेवाला गोकर्णाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते.

  • उपवासाच्या दिवशी शंकराची पूजा करताना चुकूनही हळद-कुंकू वाहू नका.

  • या दिवशी उपवास करत असल्यामुळे जेवणामध्ये लसूण आणि कांद्याचा वापर टाळावा.

  • श्रावणाच्या उपवासात मद्यपान आणि मांसाहार टाळावा.

Shivamuth Puja
Shravan 2024 : श्रावणात उपवासाला करा 'या' मिठाचा वापर, फायदे वाचून व्हाल थक्क!

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात आवर्जून करा 'हे' उपाय

  • तुम्हाला व्यवहारांमध्ये अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर श्रावणी सोमवारी महादेवाला केशरयुक्त दूध अर्पण करावे.

  • तुम्हाला करिअरची दिशा समजत नसल्यास किंवा करिअर मध्ये अडथळे येत असल्यास मुलांनी भगवान शंकराला उसाच्या रसाचा अभिषेक करावा.

  • वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असल्यास, जोडीने श्रावणी सोमवारचे व्रत करा आणि दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन दानधर्म करा.

  • घरामध्ये जर कोणाला शारीरिक किंवा मानसिक त्रास असल्यास, उपवासाच्या दिवशी शंकराला चंदनाचा लेप लावा आणि दुधाने अभिषेक करा.

  • श्रावणी सोमवारात उपवासाला अन्नदान आणि पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात.

डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Shivamuth Puja
Shravan 2024 : श्रावण सोमवारी 'असा' करा साज श्रृंगार, 'या' रंगाच्या साडीला असतो मान!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com