Kalyan News : श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला; हातात शस्त्र घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद

Kalyan Crime News : टिटवाळा जवळील म्हसकळ गावातील श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . टिटवाळा येथील फळेगाव मार्गावर म्हस्कळ गावामध्ये शंकरनाथ सेवा मंडळ गोरक्षनाथ आखाडा मंडळ ट्रस्टच्या जागेत श्री शंकर महाराजांच्या मुख्य मंदिरांसह 5 मंदिरे आहेत.
Kalyan News
Kalyan News Saam Digital

अभिजीत देशमुख

टिटवाळा जवळील म्हसकळ गावातील श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . टिटवाळा येथील फळेगाव मार्गावर म्हस्कळ गावामध्ये शंकरनाथ सेवा मंडळ गोरक्षनाथ आखाडा मंडळ ट्रस्टच्या जागेत श्री शंकर महाराजांच्या मुख्य मंदिरांसह 5 मंदिरे आहेत. यापैकी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरासमोरील दानपेटी गायब असल्याची माहिती 22 एप्रिल रोजी सकाळी समोर आली.

दानपेटी चोरीला गेल्याची माहिती समजताच ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी तातडीने मंदिर परिसरात धाव घेतली. मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले. त्यामध्ये तीन दरोडेखोर तोंडाला आणि डोक्याला रुमाल बांधून श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील दानपेटी घेऊन जात असल्याचं आढळून आलं.

Kalyan News
Shirur News: बैलगाडा घाटात कौटुंबीक वाद, तुफान हाणामारीत तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

त्याआधारे मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी तिघा अनोळखी व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत .गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरात मंदिरात चोरी होण्याच्या घटना वाढत आहेत .

Kalyan News
Buldhana Breaking: किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com