Banana for kidney stones: किडनी स्टोनच्या रूग्णांनी केळी खावीत का? डॉक्टरांनी दूर केला संभ्रम

किडनी स्टोन असताना केळी खावीत की टाळावीत, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. केळ्यामध्ये पोटॅशियम असून ते कमी ऑक्सालेट असलेल्या फळांमध्ये येते. मात्र किडनी स्टोनचा प्रकार, आरोग्यस्थिती आणि डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेणे आवश्यक आहे.
Banana for kidney stones
Banana for kidney stonessaam tv
Published On

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे तरुणांमध्ये किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याची समस्या वाढताना दिसते. किडनीमध्ये स्टोन झाला की अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो, तो म्हणजे हा त्रास झाला की नेमकं काय खाल्लं पाहिजे? अशावेळी फळांबाबतही लोकांच्या मनात संभ्रम असतो. त्यात केळ्याचाही समावेश होतो.

काही लोकांना वाटतं की, किडनी स्टोन असताना केळी खाल्ल्याने समस्या वाढू शकते. मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, केळी किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीला खाता येऊ शकतं. केळी आणि किडनी स्टोन याबाबत संशोधन काय सांगतं आणि डॉक्टरांचं मत काय आहे, हे जाणून घेऊया.

Banana for kidney stones
Heart Attack : सावधान! पोटात होणाऱ्या 'या' वेदना म्हणजे हार्ट अटॅक तर नाही ना? दुर्लक्ष केल्यास बेतेल जीवावर

किडनी स्टोन म्हणजे काय?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, किडनी स्टोन म्हणजे किडनीमध्ये तयार होणारे कठीण कण. शरीरातील काही खनिजं आणि क्षार एकत्र येऊन किडनीमध्ये साचतात आणि हळूहळू त्याचा स्टोन तयार होतो. किडनी स्टोनचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये कॅल्शियम ऑक्सालेट स्टोन हा सर्वात सामान्य प्रकार आहे. याशिवाय युरिक अॅसिड, स्ट्रुवाइट आणि सिस्टीन स्टोन हे प्रकारही आढळतात.

किडनी स्टोनमध्ये केळी खाऊ शकतो का?

मेडिसिन नेटवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, केळ्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. पोटॅशियम असलेले पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

पोटॅशियम शरीरातील कॅल्शियमच्या पातळीवर परिणाम करते आणि लघवीतून कॅल्शियम बाहेर जाण्याचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करू शकते. त्यामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते.

किडनी स्टोनमध्ये कॅल्शियम ऑक्सालेट स्टोन सर्वाधिक आढळतात. त्यामुळे अशा प्रकारचा स्टोन असलेल्या रुग्णांना ऑक्सालेटचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. केळ्यामध्ये ऑक्सालेटचे प्रमाण कमी असल्याने ते कमी ऑक्सालेट असलेल्या फळांमध्ये मानलं जातं.

केळ्यामध्ये व्हिटॅमिन B6 देखील असते. शरीरात ऑक्सालेट तयार होण्याच्या प्रक्रियेत व्हिटॅमिन B6 ची भूमिका असू शकते. संशोधनानुसार, शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन B6 मिळाल्यास कॅल्शियम ऑक्सालेट स्टोन तयार होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

Banana for kidney stones
Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे 'हे' ५ पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची चूक करू नका

किडनी स्टोनमध्ये केळं खाण्याबाबत डॉक्टर काय सांगतात?

दिल्लीतील मॉडेल टाउनमधील यथार्थ हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन विभागाचे संचालक डॉ. संजय गुप्ता यांच्या मते, किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीला केळं खाणं सुरक्षित आहे. किडनीमध्ये स्टोन असला तरी व्यक्ती केळी खाऊ शकते. मात्र, त्याचे सेवन योग्य प्रमाणात करणं महत्त्वाचं आहे. किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी केळं जास्त प्रमाणात खाण्याऐवजी मर्यादित प्रमाणात खावं.

Banana for kidney stones
Heart attack symptoms: हार्ट अटॅक आला की शरीरात नेमकं काय घडतं? डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून वेळीच धोका ओळखा

किडनी स्टोनमध्ये केळी कशी खावीत?

  • किडनी स्टोनची समस्या असल्यास केळं खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

  • दिवसातून एक केळं खाऊ शकता.

  • केळी खात असताना दिवसभर पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहे.

  • फक्त केळी खाल्ल्याने किडनी स्टोन बरा होत नाही.

  • किडनी स्टोन असताना संतुलित आहार, कमी मीठ आणि पुरेसं पाणी याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॅल्शियम किंवा इतर कोणतेही सप्लिमेंट घेऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com