Shreya Maskar
फ्लेवर्ड योगर्टमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त प्रक्रिया केलेली साखर असते. अतिरिक्त साखरेचे यकृतातील चरबीमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे तुमचे वाईट कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका वाढतो.
फिटनेससाठी उपयुक्त असलेले प्रोटीन बार हाई-फ्रुक्टोज कॉर्न सिरपने भरलेले असते. हे घटक शरीरातील दाह वाढवतात आणि धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची प्रक्रिया वेगवान करतात.
फळांचा रसामध्ये, ताज्या फळांमध्ये आढळणारे आवश्यक फायबर नसते. तो प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि यकृताला धोकादायक चरबी साठवण्यास भाग पाडते.
पॅकेट फूड बनवायला सोपे जरी असले तर यामध्ये सोडियमचे प्रमाण प्रचंड असते. सोडियमच्या उच्च पातळीमुळे शरीरात पाणी साठते, ज्यामुळे हृदयाला अधिक जोर लावावा लागतो आणि रक्तदाब वाढतो.
तुपामध्ये संतृप्त चरबी असते. जर एखाद्या व्यक्तीला हृदयाची समस्या असेल तर त्याने तुपाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. संतुलित आहार आणि कमी चरबीयुक्त पर्यायांचा अवलंब करून हृदयाचे आरोग्य राखता येते.
जास्त तेल आणि मसाल्यांनी बनवलेले प्रक्रिया केलेले किंवा मांसाहारी पदार्थ हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात.
बदाम हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा चांगला स्रोत आहे, परंतु त्यामध्ये चरबी आणि कॅलरीज देखील असतात, त्यामुळे हृदयाच्या रुग्णांनी बदाम जास्त प्रमाणात सेवन करू नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.