Shreya Maskar
तुमचा अति राग आरोग्यास घातक ठरू शकतो. अति रागामुळे हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो. रागामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात.
अति रागामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक वाढतो, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे प्रसरण तात्पुरते कमी होते आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.
सतत राग राग आणि चिडचिड केल्यामुळे धमन्या आकुंचन पावतात आणि तुमच्या हृदयाला अधिक जोराने रक्त पंप करण्यास भाग पाडतात.
काही मिनिटांसाठी आलेला राग रक्तवाहिन्यांची योग्यरित्या प्रसरण पावण्याची क्षमता कमी करतो. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते.
तीव्र रागाच्या भडक्यानंतरच्या दोन तासांत हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
रक्तवाहिन्या वारंवार आकुंचन पावल्यामुळे धमन्यांच्या आतील आवरणाला नुकसान पोहोचते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस (ज्यामध्ये धमन्यांच्या आत चरबी, कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम जमा होऊन 'प्लॉक' (Plaque) तयार होतो) होतो.
सततचा उच्च रक्तदाब कालांतराने हृदय , रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला कमकुवत करतो. वारंवार अनियंत्रित रागामुळे कायमस्वरूपी हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.