Heart Attack : सकाळी केलेली 'ही' छोटी चूक वाढवते हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

Shreya Maskar

अलार्म वाजताच जागे होणे

सकाळी गाढ झोपेत असताना अलार्मच्या आवाजाने अचानक जागे झाल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाईनसारख्या तणाव संप्रेरकांमध्ये (स्ट्रेस हार्मोन्स) वेगाने वाढ होते. यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अचानक वाढतात, ज्यामुळे हृदयावर खूप ताण येतो.

alarm rings | pinterest

अलार्म वाजल्यावर काय करावे?

कधीही अलार्म वाजल्यावर पटकन उठू नका. अलार्म वाजल्यानंतर २-५ मिनिटे अंथरुणातच राहा, एक दीर्घ श्वास घ्या, शरीर ताणा आणि मग हळू हळू उठा.

alarm | pinterest

सकाळचा चहा टाळा

रिकाम्या पोटी बेड टी किंवा कॉफी प्यायल्याने ॲसिडीटी वाढते आणि डिहायड्रेशन होऊ शकते. रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्यास हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि रक्तदाब अचानक वाढू शकतो.

morning tea | pinterest

सकाळी उठल्यावर पहिले का खावे?

रात्रभर डिहायड्रेटेड राहिलेल्या अवयवांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर १-२ ग्लास कोमट पाणी प्या.

waking | pinterest

जड व्यायाम

वॉर्म-अप न करता उठल्याबरोबर जड वजन उचलणे किंवा उच्च-तीव्रतेचा कार्डिओ व्यायाम सुरू करणे हृदयासाठी धोकादायक असू शकते.

Strenuous exercise | pinterest

वॉर्म-अप करा

सकाळी रक्त थोडे घट्ट असते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो. म्हणून, व्यायाम सुरू करण्यापूर्वी किमान ५ ते १० मिनिटे हलका वॉर्म-अप किंवा स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.

Warm up | pinterest

नाश्ता न करणे

नाश्ता न केल्याने शरीराच्या चयापचय क्रियेत अडथळा येतो आणि रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतात. नाश्त्यामध्ये जास्त तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा अतिरिक्त साखर खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

Breakfast | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : महिलांनो! 'या' वयानंतर वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ३ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...