Kamakhya Temple Mystery: या मंदिरात पुरुषांना 'नो एन्ट्री'! आसामच्या कामाख्या मंदिराचे रहस्य काय? पाहा Video

Devi Kamakhya Mandir : कामाख्या देवीच्या मंदिरात का नाकारले जाते पुरुषांना दर्शन?
Kamakhya Temple Mystery
Kamakhya Temple Mysterysaam tv
Published On

Assam's Kamakhya Temple Mystery:

आसामच्या गुवाहटी येथील कामाख्या मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक असलेले, देवी सती (भगवती)चे मंदीर आहे. हे मंदिर एक जागरुक देवस्थान असून, तंत्र-मंत्र शास्त्रात या मंदिराचे खूप महत्त्व आहे.

राजधानी दिसपूर येथून 6 कि.मी. अंतरावर असलेल्या निलांचल पर्वतावर हे मंदिर स्थित आहे. मंदिर दगडाने कोरलेले असून, मंदिरात देवीची विशिष्ट मूर्ती, आभूषणे, वस्त्रे असून येथे नियमित पूजा केली जाते.

Kamakhya Temple Mystery
Most Thriller Fort In Karjat : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला काळ्या कातळातील गिरीदुर्ग, कर्जतपासून अवघ्या काही अंतरावर

1. काय आहे कामाख्या देवीच्या मंदिराचे रहस्य?

कामाख्या मंदिर (Temple) हे देवी सतीचे मंदिर आहे. पुराणात सांगितल्याप्रमाणे सतीने स्वतःला अग्नित समर्पित केल्यानंतर महादेवांच्या आक्रोशास क्षमवण्यासाठी विष्णू देवांनी सुदर्शनचक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 तुकडे केले होते. त्यावेळी ते तुकडे पृथ्वीवर ज्या-ज्या ठिकाणी पडले ती ठिकाणे शक्तिपीठे (Shaktipeeth) म्हणून नावारुपास आली.

देवी सतीच्या योनीचा भाग येथे पडला आणि या शक्तिपीठाची येथे स्थापना झाली असे सांगितले जाते. तेव्हापासून आतापर्यंत अंबुवाची पर्वाचा कालावधी हा देवी सतीचा रजस्वला पर्वाचा काळ असतो. शास्त्रानुसार, प्रत्येक युगात हा रजस्वला पर्वाचा कालावधी वेगळा होता. कलियुगात हा कालावधी दरवर्षी जून महिन्यात येतो. या कालावधीत देवी तीन दिवस रजस्वला होते. याकाळात देवीच्या योनीमार्गातून पाण्याऐवजी तीन दिवस रक्त वाहते. या काळात मंदिर बंद केले जाते. रजस्वला काळ संपल्यानंतर देवीची विशेष पूजा केली जाते.

Kamakhya Temple Mystery
Navratri Festival Tour : IRCTC चा नवा प्लान! ८ हजारात करता येणार वैष्णोदेवीचे दर्शन, बुकिंग प्रोसेस जाणून घ्या

2. का नाकारले जाते पुरुषांना दर्शन?

कामाख्या मंदिर हे देवी सतीच्या शक्तिपीठांपैकी एक असून, मंदिरात देवीच्या योनीची मूर्ती स्थापित आहे. देवी दरवर्षी अंबुवाची पर्वाच्या कालावधीत रजस्वला होते. या कालावधीत देवीच्या योनी मार्गातून रक्त वाहते. याकाळात फक्त पुरुषांनाच नव्हे तर कोणालाही देवीचे दर्शन दिले जात नाही. तीन दिवसांसाठी मंदिर बंद केले जाते आणि चौथ्या दिवशी धुमधडाक्यात देवीच्या (Devi) मंदिराची दारे उघडली जातात.

3. भाविकांना दिला जातो ओल्या कापडाचा प्रसाद

कामाख्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे देवीची मूर्ती नसून, योनीच्या आकाराचा दगड आहे. ज्यामधून पाणी वाहत असते. त्यामुळे येथे योनीची पूजा केली जाते. देवीच्या मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरलेला असतो. देवीच्या रजस्वला काळात हा कपडा लाल होतो. नंतर हाच कपडा भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. अंबूवाचन काळात देवीच्या गर्भगृहाची द्वारे आपोआप बंद होतात. तेव्हा अशी मान्यता आहे की हा अंबुवाचन काळ सर्व मांत्रिक व तंत्र उपासकांसाठी पवित्र असतो. याकाळात जगभरातील मांत्रिक येथे उपासनेसाठी व सिद्धी मिळवण्यासाठी येतात.

4. जाती-धर्मांत भेद केला जात नाही

कामाख्या देवीचे मंदिर हे आद्याशक्ती महाभैरवी सतीचे तीर्थ क्षेत्र आहे. जे जगातील सर्वात मोठे कौमारी क्षेत्र म्हाणून देखील ओळखले जाते. त्यामुळे येथे शक्तिपीठाच्या ठिकाणी कुमारी पूजनाचे अनुष्ठान मुख्य मानले जाते. येथे कोणत्याही प्रकारचा जाती भेद पाळला जात नाही. सर्व जाती-धर्म, कुल, वर्णांतील कुमारीकांना आदिशक्तीचे रुप मानले जाते. असे न केल्यास त्या साधकाची सिद्धी नाहीशी होते असे सांगितले जाते. या कारणामुळेच हे सर्वात जागरुक देवस्थानांपैकी एक स्थान मानले जाते. येथे फक्त भारतातूनच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि अफ्रिकेसारख्या देशातून देखील तंत्र उपासक दर्शनासाठी येतात.

टीप : येथे दिलेली माहिती संशोधनावर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Kamakhya Temple Mystery
Navratri Utsav 2023: एकाच ठिकाणी साडेतीन शक्तिपीठांचं दर्शन; महाराष्ट्रातील 'या' मंदिराची आख्यायिका माहितीये का?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com