Shardiya Navratri 2023 : शारदीय नवरात्रीत कन्या पूजन कधी? अष्टमी- नवमी तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Kanya Pujan Date 2023 : या वर्षी शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कन्या पूजा केली जाईल आणि कोणता शुभ मुहूर्त आहे हे जाणून घेऊया
Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023Saam Tv
Published On

Kanya Pujan Shubh Muhurt :

हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु झाला आहे याची सांगता २४ ऑक्टोबर दसऱ्याला होणार आहे.

या काळात नवदुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. दरवर्षी अष्टमी नवमीच्या दिवशी कन्या पूजन केले जाते. यंदा ही तिथी कधी आहे. जाणून घेऊया. नवरात्रीचे नऊ दिवस भाविक उपवास करतात आणि विधीनुसार पूजा करतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवरात्रीत (Navratri) नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असले तरी अष्टमी आणि नवमी तिथी अधिक महत्त्वाची मानली जाते, कारण नवरात्रीच्या काळात मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. या वर्षी शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कन्या पूजा केली जाईल आणि कोणता शुभ मुहूर्त आहे हे जाणून घेऊया...

Shardiya Navratri 2023
Dussehra 2023 : या राशींसाठी दसरा ठरेल शुभ, होईल भाग्योदय; नवीन काम करण्याची मिळेल संधी

1. कन्या पूजा २०२३ कधी आहे?

नवरात्रीत काही लोक दुर्गा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजा करतात तर काही लोक महानवमीच्या दिवशी करतात. शारदीय नवरात्रीमध्ये 22 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमीला किंवा 23 ऑक्टोबरला महानवमीच्या दिवशी कन्या पूजा (Puja) करू शकता.

2. अष्टमीला कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त

२२ ऑक्टोबरला दुर्गाअष्टमी असून या दिवशी सकाळी सर्वार्थ सिद्धी योग सुरु होत आहे. कन्या पूजनचा शुभ मुहूर्त हा सकाळी ०६.२६ ते संध्याकाळी ६.४४ पर्यंत आहे. २२ ऑक्टोबरला सकाळपासून कन्या पूजन करता येईल.

Shardiya Navratri 2023
Most Dangerous Fort In Pune : डोळ्यांना स्वर्गसुख देणारा पुण्यातील चित्तथरारक किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना भूरळ!

3. या वर्षी महानवमीला कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त

यंदा महानवमी ही २३ ऑक्टोबरला असून या दिवशी सकाळी सर्वार्थ सिद्धी योग आहे. सकाळी ०६:२७ ते संध्याकाळी ०५:१४ पर्यंत आहे. त्यानंतर रवि योग सुरु होईल.

4. कन्या पूजा पद्धत

  • दुर्गाष्टमी किंवा महानवमीला कन्या पूजन करताना सर्वात आधी नवदुर्गेची पूजा करा.

  • त्यानंतर कन्या पूजनासाठी मुलींना आमंत्रित करा.

  • मुली घरी (Home) आल्यानंतर त्यांना आसनावर बसवा.

  • यानंतर त्याचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि त्याची फुले, अक्षत इत्यादींनी पूजा करावी.

  • यानंतर त्यांना जेवू घाला. जेवणात तुम्ही प्रसाद म्हणून हलवा, चणे आणि पुरी बनवली जाते.

  • माँ दुर्गेच्या रूपात मुलींना भोजन दिल्यानंतर दक्षिणा द्या आणि तिच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com