Self Expression Tips: समाजात विचार व्यक्त करताना संकोच येतोय,'या' टिप्समुळे काम होईल सोपे

How To Express Inner Thoughts : खरं तर आपल्या मनात काय विचार आहे, हे स्पष्ट करण्याताना अनेकदा आपण संकोचतो. त्यामुळे आज आपण मनमोकळेपणाने कसे विचार व्यक्त करता येतील, ते जाणून घेऊ या.
Self Expression Tips
Self Expression TipsYandex

Latest Lifestyle News

अनेकदा आपण बोलताना अडखळतो, अशा वेळी दुसऱ्याने आपले विचार समजून घ्यावे अशी आपली अपेक्षा असते. परंतु जोपर्यंत आपण बोलत नाही, तोपर्यंत आपल्या मनात काय (Self Expression Tips) आहे, हे समोरच्याला समजणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपले विचार समोरच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्यासाठी आपलं मत उघडपणे मांडता येणं गरजेचं आहे. (Latest Marathi News)

जेव्हा आपण ऑफिसमध्ये खूप काम करतो, तेव्हा अनेकदा ऑफिस पॉलिटीक्सला आपल्याला सामोरं जावं लागतं. किंवा तुमच्या टॅलेंटबद्दल तुमच्या हक्कांसाठी लढायची वेळ (Self Expression) येते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही काही बोलू शकले नाही. तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. आपलं मत स्पष्ट न मांडल्यामुळे आपल्याला कमीपणा घेण्याची वेळ येते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्व-अभिव्यक्ती म्हणजे काय?

स्व-अभिव्यक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला घडणाऱ्या क्रियाकलापांमध्ये सामील होण्याची प्रक्रिया होय.आपले आंतरिक विचार, भावना आणि इच्छा यांचे मिश्रण लोकांसमोर उघडपणे व्यक्त करणे म्हणजे स्व-अभिव्यक्ती (Inner Thoughts) होय. खऱ्या अर्थाने माणसाच्या सर्जनशील कला आणि कल्पनाशक्तीला एकत्रितपणे स्व-अभिव्यक्ती असे म्हणतात.

1. आत्मविश्वास वाढवा

तुम्ही तुमचे विचार आणि भावना लोकांसमोर व्यक्त करत राहिल्याने तुमची प्रेरणा वाढत जाते. म्हणूनच, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि स्वतःला आव्हान देत आपला आत्मविश्वास (How To Express Inner Thoughts) वाढवा. लोकांमध्ये बिनधास्तपणे वावरा आणि आत्मविश्वासाने बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढेल.

Self Expression Tips
Mental Health : या चुकीच्या सवयींमुळे वाढतो मानसिक ताण, वेळीच घ्या काळजी

2. तुमचे मत व्यक्त करा

समाजात वावरताना तुम्ही काय विचार करता, हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे तुमचे मत व्यक्त करण्यासाठी नेहमी दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकं काय विचार करतील, यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे सांगा. तुमचा निर्णय किंवा विचार योग्य आहे, हे स्पष्ट करा.

3. एकट्याने वेळ घालवा

स्वत:वर विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वत:ची रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वत:ला चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी तुम्हाला स्वतःसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे (Latest Lifestyle News) आणि स्वतःबद्दल विचार करणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वत:वर लक्ष केंद्रित करा. स्वत:च्या विचारांची रिस्पेक्ट करा, त्यांना व्यवस्थितपणे मांडायला शिका.

Self Expression Tips
Health Risks For women : महिलांनो फिटनेसवर लक्ष द्या, वयाच्या चाळीशीनंतर होऊ शकतात ५ गंभीर आजार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com