Health Risks For women : महिलांनो फिटनेसवर लक्ष द्या, वयाच्या चाळीशीनंतर होऊ शकतात ५ गंभीर आजार

women health issue after 40 : महिलांनी विशेष म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
women health issue
women health issue Saam tv

women health :

पुरुषांपेक्षा महिलांना अधिक ताणतणावातून जावं लागतं. वयानुसार महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. यामुळे महिलांनी विशेष म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. (Latest Marathi News)

'आजतक'च्या वृत्तानुसार, जनरल जनरल फिजिशियन डॉ. टॉम जेनकिंस यांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या चाळीशीनंतर महिलांना काही शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागतं. आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलांना अशा समस्यांना सामोरे जावं लागतं. यामुळे महिलांनी आरोग्याविषयी सावध राहणे गरजेचे आहे. अन्यथा या पाच गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

women health issue
Health Tips: डाळिंब कोणी खाऊ नये?

ऑस्टियोपोरोसिस

वयाच्या चाळीशीनंतर मेनोपॉजचा काळ जवळ आल्यानंतर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात. अशावेळी अशा महिलांनी त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

ब्रेस्ट कॅन्सर

रिपोर्टनुसार, २८ महिलांपैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. तुमच्या जवळच्या एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं,तर त्यांनी वेळीच डॉक्टरांकडून वेळोवेळी उपचार घेणे गरजेचे आहे.

गर्भाशयाचा कॅन्सर

गर्भाशयाच्या कॅन्सर हा महिलांना वयाच्या ३५ ते ४४ व्या वर्षादरम्यान होतो. या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक तीन वर्षानंतर स्क्रिनिंग करणे गरजेचे असते. हा आजार तपासण्यासाठी काही मिनिटांच्या चाचण्या आहेत.

रक्ताची कमतरता

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगात १५ ते ४९ वर्षाच्या ३० टक्के महिलांना अॅनिमिया होण्याची शक्यता असते. हा आजार झाल्यानंतर उर्जा कमी होणे, श्वास घेताना अडचण येणे, छातीत धडधड होणे, त्वता पिवळी होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

women health issue
Health Tips: दुध आणि केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

टीप : लेखातील बाबी साम टीव्ही केवळ माहितीच्या अनुषंगाने वाचकापर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही. आरोग्याविषयी अधिक तपशिलासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com