Immortality : माणूस अमर होणार? मेल्यानंतरही जिंवत राहणार; विज्ञानाचा चमत्कार, अमरत्वाचं वरदान

मेल्यानंतरही तुम्हाला जिंवत राहता येणार आहे. 2050 पर्यंत माणूस अमर होणार आहे. मात्र माणसाला हे अमरत्व कसं मिळणार? पाहयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Immortality
ImmortalitySaam Tv Youtube
Published On

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

माणूस आता अमर होणार, आश्चर्य वाटून घेऊ नका. हे विधान आम्ही असंच करत नाही आहोत तर याला विज्ञानाचा आधार आहे, येत्या 25 वर्षांनी तुम्ही या जगात नसाल.. तरीही तुम्ही अमर होऊ शकता. आम्ही जे सांगतोय, ते ऐकून तुमचा गोंधळ उडाला असेल, तेव्हा चला... तोच क्लिअर करूया..

माणसाच्या मनात नेहमी मृत्युची भीती असते आणि अमरत्वाची आस असते. पौराणिक युगात योगी तपश्चर्या करून देवाकडे अमरत्वाचं वरदान मागायचे. मात्र विज्ञान युगात तुम्हाला सहज अमरत्व मिळू शकतं. भविष्यवेत्ता आणि शास्त्रज्ञ डॉ. इयान पियर्सन यांच्या मते, माणसाला 2050 पर्यंत मृत्यूनंतरही जिवंत राहणं शक्य होणार आहे. पण हे कसं होणार?

Immortality
Fixer PA : मंत्र्यांच्या पीएंवर कुणाची नजर? मंत्रालयातील 'दलाल' हद्दपार होणार? सरकारच्या निर्णयानं दलाल बेहाल?

मृत्यूनंतर माणूस कसा होणार 'अमर'

- मेंदूतील माहिती कॉम्प्युटर आणि रोबोटिक शरीरात अपलोड करता येणार

- जेनेटिक इंजिनियरिंगद्वारे वृद्धत्वाला रोखता येणार

- मानवाच्या शरीरातील पेशी निरोगी ठेवता येणार

- ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस तंत्रज्ञानाद्वारे आठवणी आणि विचार साठवता येतील

- तांत्रिकदृष्ट्या मानवाला जिवंत राहता येईल

Immortality
Crime : कामाच्या निमित्तानं बोलावलं अन्...; मदरशातच शिक्षिकेसोबत भयंकर घडलं, मदरसा संचालकाचं धक्कादायक कृत्य

भविष्यवेत्ता आणि शास्त्रज्ञ डॉ. इयान पियर्सन यांनी 2050 पर्यंत माणूस कसा अमर होईल? यासाठी माणसाला कोणत्या टप्प्यातून जावे लागेल? हे देखील सांगितलंय.

अमरत्वाचे टप्पे

- AI आणि मानवी मेंदूंची क्षमता 2029 पर्यंत समान होणार

- 2030 ला मानवी मेंदू संगणकीय प्रणालीशी जोडला जाईल

- 2050 पर्यंत मानव डिजिटल स्वरूपात त्याची चेतना जतन करू शकेल

मानवी मेंदूचे आणि तंत्रज्ञानाचे हे मिलन मानवाला अमरत्वाकडे घेऊन जाणार आहे. प्रत्यक्ष शरीर नसलं तरी तंत्रज्ञान मानवाचा मेंदू कायम ठेवेल..मात्र हे वरदान ठरेल की शाप हे येणारा काळच ठरवेल.

Immortality
Viral : अजबच! खड्ड्यानं जीवात जीव आणला, अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात आदळली; मृत माणूस उठून बसला, डॉक्टरही चक्रावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com