Samsung 5G Phone Under 10k : दमदार बॅटरी, डिस्प्लेही जबरदस्त; सॅमसंगचा 5G फोन खरेदी करा १० हजारांपेक्षा कमी किमतीत

Samsung Phone In Budget : जर तुम्हालाही कमी किमतीत लेटस्ट स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमधून खरेदी करु शकता.
Samsung 5G Phone Under 10k
Samsung 5G Phone Under 10kSaam Tv
Published On

Samsung Galaxy F14 5G Price :

८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त डिस्काउंट आणि डील मिळाली आहे. सध्या हा सेल संपण्यासाठी अवघे काही तासचं शिल्लक आहे.

जर तुम्हालाही कमी किमतीत लेटस्ट स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टच्या सेलमधून खरेदी करु शकता. Samsung Galaxy F14 5G हा फोन 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या फोनमध्ये 4GB रॅम व्हेरिएंट असून फ्लिपकार्टवर सेलमध्ये कमी किमतीत मिळत आहे.

1. किती टक्के मिळणार सूट?

Samsung Galaxy F14 5G हा फोन 4GB RAM व्हेरिएंटची मूळ किमत ही १७,४९० रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ११,४९० रुपयांना मिळत आहे. यामध्ये ६ हजारांची सूट तुम्हाला मिळणार आहे. तसेच बँकेच्या ऑफरवर तुम्हाला १५०० रुपयांची सूट मिळेल.

2. बँक ऑफर

सॅमसंगच्या फोनवर सर्व बँक (Bank) क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ऑफर मिळत आहे. फोनची किंमत ९,९९० रुपये होईल. 5G फोन तुम्हाला १० हजारात खरेदी करता येणार आहे. इतकेच नाही तर या फोनवर एक्सचेंज ऑफर (Offer) देखील मिळत आहे.

Samsung 5G Phone Under 10k
Kotak Bank Offer : Flipkart, Myntra वर ऑफर्सचा धमका! कोटक बँकच्या कार्डवर मिळणार जबरदस्त सूट

3. स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये (Phone) 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे. ज्यामध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास 5 मिळत आहे. रॅम आणि स्टोरेजचा विचार केल्यास यामध्ये 4GB 128GB आणि 6GB 128GB मध्ये मिळत आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, २ मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा असलेले दोन मागील कॅमेरा मिळत आहे. तसेच बॅक कॅमेरा हा १३ मेगापिक्सेल देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी असेल. तसेच हा फोन Exynos 1330 प्रोसेसरवर काम करेल आणि हा फोन 13 5G बँडला सपोर्ट करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com