Muscle Loss With Aging: उतारवयाकडे जाताना स्नायूंकडे लक्ष देणे महत्त्वाचे का आहे? त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या

Muscle Tissue Changes With Aging : आरोग्याची स्थिती ही हातांच्या तळव्यामध्ये खरेच असू शकते का ?
Sacrospinalis Muscle
Sacrospinalis MuscleSaam Tv
Published On

Muscle Function : एखाद्या बरणीवर घट्ट बसलेल्या आणि कितीही जोर लावला तरीही न उघडणाऱ्या झाकणाचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना यांचा अनुभव आलाच असेल. कधी आपण ते किचनच्या ओट्यावर आपटतो, कधी गरम पाण्याखाली धरतो आणि सगळे प्रयत्न थकले की मदतीसाठी कुणालातरी हाक मारतो.

आपल्याला असे वाटते की, झाकण अधिक घट्ट होत चालले आहे परंतु, अनेकांच्या बाबतीत याचा शरीराचे दुर्बल परिणाम पाहायला मिळतो. पाहायला गेले तर आरोग्याची स्थिती ही हातांच्या तळव्यामध्ये खरेच असू शकते का ? या प्रश्नाचं उत्तर तितकंच सरळसाधं नाही, पण एक खरं आहे की तुमच्या हाताची पकड हा एकूणच तुमच्या स्नायूंच्या बळकटपणावर अवलंबून असतो.

Sacrospinalis Muscle
Women Body Changes : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांमध्ये होतात हे 8 बदल, सतत राहातात अस्वस्थ

उतारवयात आपण स्नायूंच्या आरोग्याकडे (Health) बरेचदा दुर्लक्ष करतो. १७.५ टक्‍के भारतीयांना स्नायूंच्या गंभीर आजाराची म्हणजे सार्कोपीनियाची समस्या आहे. असे एका सर्वेक्षणातून आढळून आले. यामध्ये आशियाई आणि युरोपीय देशांच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे.

आपले स्नायू सांगतात की, तुमचे वयोवृद्ध कसे असेल. उतारवयात सार्कोपीनियाचे परिणाम कमी करण्यासाठी आपण स्नायूंच्या आरोग्य पुन्हा कसे राखता येईल याबद्दल अबॉटच्या न्यूट्रिशन बिझनेसमधील मेडिकल अँड सायंटिफिक अफेअर्स विभागाचे प्रमुख डॉ. इरफान शेख यांनी सांगितले आहे.

Sacrospinalis Muscle
Fitness Habits at Age 30: महिलांनो, वयाच्या 30 व्या वर्षी 'हे' 6 काम कराच; म्हातारपणी दिसाल तरुण !

1. स्नायूंमुळे आरोग्यावर कसा होतो परिणाम ?

सार्कोपीनिया, ज्याला गंभीर टप्प्यावर पोहोचलेली स्नायूंची हानी असेही म्हटले जाते. ज्यात वयोमानानुसार व्यक्तीच्या स्नायूंचे प्रमाण कमी होते. यामध्ये स्नायूंची ताकद कमकुवत होत जाते. चाळीशी सुरु झाल्यानंतर शरीरातील स्नायूचे प्रमाण दर दहा वर्षांपासून ८ टक्क्यांपर्यंत घटू शकते. ७० वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता असते.

भारतातील प्रत्येक तिसऱ्या पुरुषामध्ये (Men) आणि प्रत्येक पाचव्या स्त्रिमध्ये (Women) स्नायूंचा आजार आढळून आला आहे. जागतिक स्तरावर अंदाजे ५ कोटी लोक या सार्कोपीनियाच्या समस्येने त्रस्त आहेत आणि येत्या ४० वर्षांमध्ये हा आकडा वाढून २० कोटींवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Sacrospinalis Muscle
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

स्नायूंच्या (Muscle) हानीमुळे ऊर्जा कमी होते आणि हालचाली मंदावतात, पडण्याचा आणि फ्रॅक्चर्सचा धोका वाढतो. आजारपण वा शस्त्रक्रियेतून वाचण्याची आणि पूर्ववत होण्याची एखाद्या व्यक्तीची क्षमताही यामुळे कमी होऊ शकते . स्नायूंचे वस्तुमान मोजणे ही बॉडी मास इंडेक्स अर्थात बीएमआय या सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मापनपद्धतीहून कित्येक पट चांगली पद्धत आहे.

2. स्नायूंना पुन्हा ताकदवान बनवण्यासाठी काय कराल ?

सकाळचा नाश्ता (Breakfast) चुकवू नका कितीही घाईगडबड असली तरीही ब्रेकफास्ट जरूर घ्या. कारण ब्रेकफास्टमध्ये पुढच्या संपूर्ण दिवसभरात तुमच्या शरीराला लागणारे पोषकतत्व असतात. त्यासाठी पोषकतत्वांचा समावेश असलेला आहार घ्यायला हवा. ज्यात अंडी, कडधान्ये, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ असतील. यामुळे तुमचे पोट भरेल आणि त्याचबरोबर दिवसभर तुमच्या ऊर्जेची पातळी वर राहील.

Sacrospinalis Muscle
Women Physical Hygiene : शरीर संबंधांनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी ? इन्फेक्शन पासून राहाल दूर...

खाण्यापिण्याबरोबरच शारीरिक व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे स्नायूंना बळकट होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला दिवसभरात चालणे, सायकलिंग, पोहणे, जॉगिंग, बॅडमिंटन/क्रिकेट खेळणे किंवा अगदी पायऱ्या चढणे अशा साध्यासोप्या गोष्टींचा समावेश करून तुम्ही व्यायाम करू शकता. दर दिवशी तासभर व्यायाम केल्याने तुमच्या स्नायूंच्या ताकदीमध्ये आणि आरोग्यामध्ये फरक पडेल.

आपल्याला दिवसभरात किती प्रथिने लागतात. यामध्ये कोणते प्रथिने शरीरासाठी चांगले आहे हे देखील पाहा. पुरेळा प्रथिनेसोबत शारीरिक व्यायामाची जोड दिल्यास शरीर स्नायू घडविण्यासाठी आणि त्यांची हानी भरून काढण्यासाठी या प्रथिनांचा इष्टतम वापर करू शकेल.

उतारवयाकडे जाताना नियमितपणे आणि संतुलित आहार घेणे हे महत्त्वाचे आहेच, पण तो घेऊनही पोषणात काही कमतरता राहते. ही कमतरता भरून काढण्यासाठी लोकांनी Ensure HMBसारख्या संतुलित न्यूट्रिशन सप्लिमेंट्सचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. Beta-hydroxy-beta-methyl butyrate (HMB) या पूरक पोषकतत्वाची आहाराला जोड दिल्यास प्रौढ व्यक्तींचे लीन बॉडी मास, स्नायूंची ताकद घटत नाही व त्याची हानीही भरून निघू शकते.

Sacrospinalis Muscle
Muscle And Immunity Health : कमकुवत स्नायूंचा होतो रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम, कशी घ्याल आरोग्याची काळजी

आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंमध्ये स्नायू महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि सार्कोपीनियाचा प्रभावीपणे सामना करण्याच्या दृष्टीने स्नायूंचे आरोग्य तपासण्याचे व सुधारण्याचे अनेक परिणामकारक मार्ग आहेत. आरोग्यपूर्ण वृद्धापकाळ आणि बळकट स्नायू यांची एकमेकांना साथ असेल व त्यातून वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्य भरभरून जगणे आपल्याला शक्य होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com