

5G Smartphone Offer : मोबाईलच्या जगात सॅमसंग या ब्रॅण्डचं नाव पहिल्या स्थानी आहे. मोबाईल प्रेमींसाठी सॅमसंग ही पहिली पसंती आहे. त्यामुळे सॅमसंगच्या यूजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. सॅमसंगचा हा फोन अत्यंत स्वस्थ किमतीत विकत घेता येणार आहे.
Samsung Galaxy M34 5G हा स्मार्टफोन (Smartphone) जुलै महिन्यात लॉन्च केला होता. सॅमसंगच्या या फोनवर सूट उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटवरुन Samsung Galaxy M34 5G हा मोबाईल स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.या फोनवर २००० रुपयांपर्यंत बॅंक डिस्काउंट उपलब्ध आहे.
किंमत
Samsung Galaxy M34 5G स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये आहे. या फोनचा (Phone) पहिला प्रकार 6GB रॅम सह 128GB स्टोरेजसह येतो. याची किंमत 18,999 रुपये आहे. दुसरा प्रकार 20,999 रुपयांमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो.
ऑफर
सॅमसंगचा हा फोन Amazon वरून स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. या फोनवर HDFC बँक आणि Axis बँकेच्या क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. या बँक डिस्काउंटसह, फोन 16,999 रुपयांना खरेदी करु शकतात.
यासोबतच ग्राहक एक्सचेंज डिस्काउंटसह आणखी कमी किमतीत फोन खरेदी करू शकतात. जून्या फोनवरच्या स्थितीवर या मोबाईलची किमत अवलबूंन आहे. या फोनवर 18,094 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध आहे.
फीचर्स
Samsung Galaxy M34 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुल HD AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. हा मोबाईल (Mobile) गोरिला ग्लास 5 द्वारे संरक्षित आहे. हा सॅमसंग फोन इनहाऊस 5nm Exynos 1280 चिपसेटसह येतो. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. Samsung Galaxy M34 5G फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा फोन Android 13 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस One UI वर चालतो .
कॅमेरा
कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे तर, फोनमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह येतो. नॉर्मल कॅमेरासह, फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. यासोबतच फ्रंट कॅमेरा सेन्सरबद्दल बोलायचे झाले तर, यात 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M34 5G च्या या फोनमध्ये 6,000 mAh ची बॅटरी आहे. या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. या फोनमध्ये चार्जिंग आणि कनेक्टिव्हिटीसाठी टाइप-सी पोर्ट आहे. यासोबतच कंपनीचा म्हणण्यानुसार, फोन एका चार्जमध्ये 2 दिवसांपर्यंत बॅकअप देते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.