Lung cancer symptoms: महिलांमध्ये वाढतोय फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका; धूम्रपान न करताही या कारणांमुळे होतोय आजार, ही लक्षणं ओळखा वेळेत

धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसांचा कॅन्सर होऊ शकतो. वायू प्रदूषण, सेकेंड हँड स्मोकिंग, घरातील धूर, अनुवंशिकता आणि इतर लपलेले घटक धोका वाढवू शकतात. सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेत तपासणी केल्यास उपचाराची संधी वाढते.
Lung cancer symptoms
Lung cancer symptomssaam tv
Published On

‘फुफ्फुसांचा कॅन्सर’ म्हटलं की बहुतेकांच्या डोळ्यांसमोर लगेच मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणारी व्यक्ती उभी राहते. धूम्रपान हे आजही फुफ्फुसांच्या कॅन्सरचं प्रमुख कारण असलं तरी एक चिंताजनक वास्तव समोर येतंय की, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये विशेषतः महिलांमध्ये, फुफ्फुसांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे.

धूम्रपानाची सवय असो वा नसो फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका वाढवणारे लपलेले घटक आणि त्याची सुरुवातीची लक्षणं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Lung cancer symptoms
Jeera Water: दररोज सकाळी 30 दिवस जिऱ्याचं पाणी प्या; या 5 समस्यांपासून मिळेल आराम

धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर का होतो?

घाटकोपरच्या झायनोव्हा शाल्बी रूग्णायलयातील कन्सल्टंट थोरेसिक सर्जन आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रिया एश्पुनियानी यांनी सांगितलं की, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्ती थेट तंबाखूच्या धुरापासून दूर असल्या तरी पर्यावरणीय, अनुवंशिक आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक घटकांमुळे त्यांच्या फुफ्फुसांच्या ऊतींना दीर्घकाळ नुकसान होऊ शकतं.

सेकेंड हँड स्मोकिंग- इतर व्यक्तींच्या धूम्रपानामुळे निर्माण होणारा धूर श्वासातून शरीरात गेल्यास फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

वायू प्रदूषण: बाहेरील हवेमध्ये असलेले सूक्ष्म कण आणि विषारी प्रदूषक श्वसनसंस्थेला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवू शकतात.

घरातील विषारी घटक: घरामध्ये योग्य वेंटीलेशन नसणं, रेडॉन वायू, स्वयंपाकातून निर्माण होणारा धूर तसंच घरात वापरली जाणारी लाकूड किंवा इतर जैवइंधनं यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर हळूहळू परिणाम होऊ शकतो.

Lung cancer symptoms
High Cholesterol: दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या 5 बिया; नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात वितळेल

कामाच्या ठिकाणी असलेले धोके: औद्योगिक रसायने, ॲस्बेस्टॉस, आर्सेनिक किंवा डिझेलच्या धुराचा नियमित संपर्क आल्यास फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

आधीपासून असलेले फुफ्फुसांचे आजार: क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) किंवा पल्मोनरी फायब्रोसिससारख्या दीर्घकालीन आजारांमुळे फुफ्फुसांची या आजाराप्रती असलेली संवेदनशीलता वाढू शकते.

अनुवंशिकता: कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला फुफ्फुसांचा कर्करोग झालेला असल्यास संबंधित व्यक्तीमध्ये या आजाराची शक्यता वाढू शकते.

ही लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना आपल्याला फुफ्फुसांच्या कॅन्सर धोका असू शकतो असं सहसा वाटत नाही. त्यामुळे सुरुवातीची लक्षणं अनेकदा ॲलर्जी, साधी सर्दी किंवा किरकोळ संसर्ग समजून दुर्लक्षित केली जातात.

खालील लक्षणांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं

  • सतत राहणारा आणि बरा न होणारा खोकला

  • कोणतंही स्पष्ट कारण नसताना छातीत दुखणे किंवा छातीत जडपणा जाणवणं

  • श्वास घेताना घरघर होणं किंवा आवाजात बदल/घोगरेपणा येणं

  • दैनंदिन कामं करताना दम लागणं

  • वारंवार किंवा पुन्हा-पुन्हा छातीचे संसर्ग होणं

  • कोणतंही कारण नसताना वजन कमी होणं

  • सतत थकवा जाणवणं

Lung cancer symptoms
High Cholesterol: या ठिकाणी वेदना होत असतील तर सावध व्हा; शरीर देतंय कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com