Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला तुमच्याविषयी संशय येतोय? मग या मार्गांनी जिंका विश्वास

Relationship Tips: कोणतेही नाते टिकवण्यासाठी विश्वास हा सर्वात महत्वाचा असतो, विशेष म्हणजे पती-पत्नीच्या नातेसंबंधात, ते मजबूत असणे अधिक महत्वाचे आहे. अनेकवेळा संशयामुळे लोक आपल्या जोडीदाराचे फोनही तपासू लागतात.
Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला  तुमच्याविषयी संशय येतोय? मग या मार्गांनी जिंका विश्वास
Published On

पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीचे नाते विश्वासावर आधारित असते. हे नातं जितकं सुंदर आहे तितकंच नाजूक आहे. यात शंकेची छोटीशी ठिगणी पडली तरीही त्या नात्यात भांडणाचा भडका उडत असतो. मनात संशयाचं भूत बसल्यानंतर अनेकजण आपल्या जोडीदाराचा फोन तपासू लागतात. खरं तर, जोडीदाराप्रती असुरक्षितता, अविश्वास आणि पूर्वीच्या नात्यातील वाईट अनुभव अशा अनेक कारणांमुळे बहुतेकजण जोडीदाराचा फोन तपासत असतात. अनेक महिला आणि पुरुषांना आपल्या जोडीदाराचा फोन तपासण्याची सवय असते आणि नेहमी ते त्याच विचारात असतात.

जोडीदाराचा फोन तपासणं योग्य आहे का?

'दॅट कल्चर थिंग'शी संबंधित मानसशास्त्रज्ञ आणि कार्यकारी प्रशिक्षक गुरलीन बरुआ म्हणतात, 'सर्वसाधारणपणे रिलेशनशिपमध्ये, एका पार्टनरने दुसऱ्याचा फोन तपासणे मान्य नसते. आपल्या जोडीदाराने फोन तपासण्याची परवानगी दिली तरी ते करू नये. ही समस्या खूप गुंतागुंतीची आहे आणि अनेक महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्या पुढे म्हणतात, विश्वास हा कोणत्याही निरोगी नात्याचा आधारस्तंभ असतो. तुमच्या जोडीदाराचा फोन तपासल्याने हा विश्वास आणि एकमेकांवरील नैसर्गिक विश्वास कमकुवत होतो. गोपनीयता महत्वाची आहे आणि या सीमांचे उल्लंघन केल्याने संबंध खराब होऊ शकतात.

नात्यात अविश्वास वाढतो

पार्टनरचा फोन तपासणं हे संशयाचं भूत मनात बसवतं असतं आणि हे भूत कधीच मनातून उतरत नाही. यामुळे पार्टनर नेहमीच असुरक्षित राहतो आणि काहीवेळा त्याची कृती आक्रमकही होऊ शकते. तुमच्या जोडीदाराचा फोन तपासण्याची सवय एक एखाद्या व्यसनासारखी असते. जर नातेसंबंध OCD (ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर) सारख्या परिस्थितींनी वेढले जाते. यामुळे ध्यास, त्रास आणि सक्तीचे चक्र सुरू होते. जे मानसिक आरोग्य आणि नातेसंबंधांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू लागते.

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला  तुमच्याविषयी संशय येतोय? मग या मार्गांनी जिंका विश्वास
Relationship Tips: पार्टनर लग्नासाठी तयार आहे की नाही? 'या' ७ संकेतावरुन समजेल त्याच्या मनातली गोष्ट

संभाषण आवश्यक

बरुआ सांगतात की स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा आहे. हेरगिरी करण्याऐवजी जोडीदारांनी त्यांच्या असुरक्षिततेच्या कारणांवर चर्चा केली पाहिजे. त्यावर एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे. हा दृष्टिकोन मजबूत आणि अधिक विश्वासार्ह नातेसंबंधांना प्रोत्साहन देत असतो.

खुली चर्चा

जर तुमच्या नात्यात शंका निर्माण झाली तर जोडीदारांनी त्याबद्दल बोलावे. तसेच गोपनीयता आणि पारदर्शकता या दोन्हींचे रक्षण करण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. कोणती माहिती शेअर करावी आणि कोणती खासगी राहावी यावर सहमत झालं पाहिजे. दोघांनीही प्रामाणिकपणा जपण्यासाठी सतत काम केले पाहिजे. जेव्हा जोडीदारांनी एकमेकांच्या कृती आणि हेतूंबद्दल सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटतो तेव्हा विश्वास वाढतस असतो. त्यामुळे नेहमी गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा.

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला  तुमच्याविषयी संशय येतोय? मग या मार्गांनी जिंका विश्वास
Relationship Tips: लग्नाच्या काही महिने आधी जोडप्यांनी एकत्र का करावा प्रवास? जाणून घ्या कारणे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com