Worli Hit And Run: वरळीत 'हिट अँड रनचा थरार, भरधाव कारच्या धडकेत पती-पत्नी हवेत उडाले, भीषण अपघाताचा VIDEO समोर

Hit And Run Case In Worli Woman Death: राज्यात गेल्या काही दिवसांपासून 'हिट अॅण्ड रन'च्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. वरळीत सुद्धा अशीच धक्कादायक घटना आज सकाळी घडली.
 वरळीत 'हिट अँड रनचा थरार
Worli Hit And RunSaam Tv

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

वरळीत 'हिट अॅण्ड रन'ची घटना घडल्याचं समोर आलंय. मच्छी आणण्यासाठी एक कोळी दांपत्य घराबाहेर पडलं होतं. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने पाठीमागून धडक दिली अन् दांपत्याला फरफटत नेलं. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास वरळीतील अॅट्रीया मॉलजवळ ही घटना घडली.

नक्की कसा झाला अपघात?

वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे त्यांच्या दुचाकीवरून आज भल्या सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक (Hit And Run) दिली. दुचाकीवर मच्छी मोठ्या प्रमाणात असल्याने गाडीचे नियंत्रण सुटलं अन् ते दोघंही चारचाकी गाडीच्या बोनटवर पडले.

भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक

वेळीच नवऱ्याने गाडीच्या बोनटवरून बाजूला उडी (Worli Accident) टाकली. मात्र, महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चारचाकी चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिला फरफटत गेली. या महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी तपासून या महिलेला मृत घोषित (Accident News) केलंय.

 वरळीत 'हिट अँड रनचा थरार
Wardha ST Bus Accident : कारंजा राष्ट्रीय महामार्ग भरधाव एसटी बसने तब्बल ११ शेळ्यांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

'हीट अॅण्ड रन'ची धक्कादायक घटना

या अपघातात कार चालक पळून गेला आहे. या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत (Bike Car Accident) आहे. १८ मे रोजी पुण्यात हीट अॅण्ड रनची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर नागपूर अन् मु्ंबईतून देखील असे अपघात झाल्याचं समोर आलंय. या अपघाताने मात्र वरळी चांगलीच हादरली आहे. चारचाकीने दिलेल्या धडकेत महिलेनं जीव गमावला आहे.

 वरळीत 'हिट अँड रनचा थरार
Nagar Manmad Highway Accident : योजनेचा लाभ घेण्याची इच्छा अधुरीच राहिली; तहसील कार्यालयाकडे जाताना वाहनाने उडवले, महिला जागीच ठार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com