Sunday Rituals Prosperity : अडकलेली कामं पूर्ण होणार, पैसाही मिळणार; रविवारच्या दिवशी सूर्यदेवासाठी ५ उपाय करून तर बघा

Ravivar che Upay : रविवारी केलेले काही छोटे उपाय तुमचे नशीब बदलू शकणार आहेत. सूर्यदेवाचा खास उपाय केल्यास यश, कीर्ती आणि आनंदाचा वर्षाव होऊ शकतो. यामध्ये कोणते उपाय करायचे आहेत ते पाहूयात.
Ravivar che Upay
Ravivar che Upaysaam tv
Published On

ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने ग्रहांची दशा आणि त्याचे उपाय यामुळे आपलं भाग्य चमकू लागतं. याचा नीट विचाक केल्यास आपण आपल्या आयुष्यात योग्य ते बदल करू शकतो. शास्त्रानुसार, प्रत्येक दिवस हा एका देवाला समर्पित केला जातो. यामध्ये रविवारी सूर्य देवाची पुजा केली जाते. या दिवशी सूर्याची पुजा केल्याने जीवनात आनंद आणि ऊर्जा येणार आहे. आज तुम्ही कोणते उपाय करू शकता ते पाहूयात.

सूर्य देवाची आराधना करणं याला एक विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की, रविवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून तांब्याच्या लोट्याध्ये पाणी, लाल फुलं, तांदूळ आणि रोली अर्पण केली तर तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढते. यामुळे केवळ प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाच नाही तर मानसिक शांती देखील मिळण्यास मदत होते.

जर तुम्हाला सरकारी नोकरी, बढती किंवा समाजात आदर हवा असेल तर रविवार हा विशेषतः शुभ मानण्यात येतो. काही लोक या दिवशी उपवास देखील करतात. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या उपयांमुळे जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात.

Ravivar che Upay
Shani Dev Vakri: 500 वर्षांनंतर गुरुचा उदय आणि शनी होणार वक्री; 3 राशींचे येणार सोन्यासारखे दिवस

या उपायांनी मिळतील इच्छित परिणाम

सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाच्या वस्तू वापरणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. रविवारी लाल रंगाचे कपडे घालून सूर्य मंदिरात जाऊन लाल फुले अर्पण करावीत. याशिवाय पाण्यात तांब्याचे नाणे आणि गूळ टाकून सूर्याला अर्पण करणं हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे तुमचं भाग्य खुलणार आहे. त्याचप्रमाणे कोणती अडकलेली कामं असतील तर ती पूर्ण होणार आहे.

आजच्या दिवशी हे ५ उपाय करून पाहा

सूर्याला जल अर्पण करा

एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. यामध्ये रोली आणि तांदूळ ठेवा आणि अर्घ्य अर्पण करा.

Ravivar che Upay
Panchak Yog: 3 जूनपासून 3 राशींच्या आयुष्यात येणार अडथळे; पंचक योगामुळे प्रत्येक निर्णय घ्यावा लागणार विचारपूर्वक

गाईला चपाती खाऊ घाला

रविवारच्या दिवशी गूळ आणि तूप असलेली चपाती गाईला खाऊ घाला. यामुळे पुण्य आणि आनंद वाढतो.

लाल कपडे घाला

रविवारच्या दिवशी लाल कपडे घालण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो.

वडिलांचे आशीर्वाद घ्या

आज रविवार असून सकाळी घरातील वडिलांना नमन करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.

सूर्य मंत्राचा जप

“ओम घ्रिण सूर्याय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे तुम्हाला मनाला शांती मिळण्यास मदत होते.

Ravivar che Upay
Bhadra Yog: भद्र राजयोगाने ३ राशींचे सुरु होणार सोन्याचे दिवस; घरात सुख-पैसा येणारच

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com