Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनच्या दिवशी या हलव्याच्या रेसिपी नक्की ट्राय करुन पहा

रक्षाबंधनच्या दिवशी या पदार्थांच्या रेसिपी ट्राय करा.
Raksha Bandhan 2022 , Recipe, Food
Raksha Bandhan 2022 , Recipe, FoodSaam Tv

Raksha Bandhan 2022 : हिंदू धार्मिकतेनुसार प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून हा सण साजरा केला जातो आणि भाऊ देखील तितक्याच उत्साहाने बहिणीचे रक्षण करण्याचे आश्वासन देतो.

हे देखील पहा-

रक्षाबंधनच्या दिवशी आपण घरात अनेक गोडाधोडाचे पदार्थ बनवतो. मिठाई व इतर पदार्थ घरात आणतो. भारतातील इतर सणांप्रमाणेच हा सणही गोड पदार्थांनी तोंड गोड केल्याशिवाय अपूर्ण आहे. या दिवशी नेमके आपल्या लाडक्या भावासाठी काय बनवायचे हे आपल्याला कळत नाही. यादिवशी कोणते गोडाचे पदार्थ बनवू शकतो हे जाणून घेऊया.

रक्षाबंधनच्या दिवशी या रेसिपी नक्की ट्राय करुन बघा

१. गोडाचा पदार्थ बनवताना आपल्या सहज आठवतो तो शिरा. शिरा बनवताना आपल्याला त्यात कोणत्या सामग्री वापरल्या जातात हे आपल्याला माहित आहे. परंतु, जर तो बनवताना आपण त्यात बेसनाचा वापर केल्यास हा हलवा अधिक स्वादिष्ट बनेल.

Raksha Bandhan 2022 , Recipe, Food
Raksha Bandhan Special Recipe : रक्षाबंधनच्या दिवशी अशी बनवा बेसनापासून ही रेसिपी

२. मूग डाळ हलवा हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे जो आपण वर्षभर कोणत्याही क्षणी खाऊ शकतो. हे घरी तयार करण्यासाठी, आपल्याला मूग डाळ पेस्ट, तूप, साखर (Sugar) आणि काही ड्रायफ्रुट्सची गरज आहे. मूगाची डाळ पचण्यास अधिक हलकी असते. या दिवशी आपल्याला इतर पदार्थ खायचे असतील तर आपण ही रेसिपी नक्की बनवा.

३. सर्व फळांपैकी, केळी हे सर्वात गोड आणि मऊ आहे. शेकपासून ते स्मूदी, डेझर्ट, केक आणि बरेच काही, आपण केळी (Banana) वापरून असंख्य पाककृती बनवू शकतो. आपल्या घरात अनेकदा केळी असते. या रक्षाबंधनला आपण केळीचा हलवा बनवून आपण पदार्थाची चव वाढवू शकतो.

४. आपल्या घरात गव्हाचे पीठ नेहमी उपलब्ध असते. जर आपल्या झटपट रेसिपी बनवायची असेल तर आपण गव्हाच्या पीठाचा हलवा बनवू शकतो. यामुळे आपल्याला पौष्टिक घटक देखील मिळतील. यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ, तूप, साखर, पाणी, मनुका, वेलची, बदाम आणि पिस्त्यांचा वापर करु शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com