Pregnancy Travel Tips : प्रेग्नन्सीत फिरण्याचा आनंद घ्यायचाय? 'या' टिप्स फॉलो करून होईल सुरक्षित प्रवास

Travel During Pregnancy : आजकाल प्रेग्नन्सीमध्ये ही महिलांना फिरण्याचा मोह आवरत नाही. अशात प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या. जेणेकरून आईचा प्रवास सुरक्षित आणि आनंदी होईल.
Travel During Pregnancy
Pregnancy Travel Tips SAAM TV

आई होणे ही जगातील सर्वात मोठी आनंदाची आणि सुंदर गोष्ट आहे. पण या काळात महिलेची विशेष काळजी घेणे तितकीच जबाबदारीची गोष्ट आहे.प्रेग्नन्सी दरम्यान महिलांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. या संपूर्ण प्रवासात त्यांचे अनेक वेळा मूड स्विंग्स होत राहतात. या काळात शरीरासोबत मनाचे आरोग्य जपणे तितकेच महत्त्वाचे असते. कारण आईच्या मनावर होणारा परिणाम डायरेक्ट मुलावर होऊ शकतो.

काही महिलांना प्रेग्नन्सी मध्येही फिरण्याची आवड असते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि स्वतःची पूर्णपणे काळजी घेऊन तुम्ही प्रवास करू शकता. मात्र प्रेग्नेंसी मध्ये प्रवास करताना खालील गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

आहाराकडे लक्ष

प्रवासात खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून पौष्टिक खाण्याचे विविध प्रकार आपल्या सोबत कायम ठेवावे. महिलेने प्रेग्नन्सी दरम्यान हायड्रेट राहणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रवासादरम्यान पाणी किंवा सरबत प्यावे. तसेच पचायला सोपे असलेले जेवण खावे.

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये प्रवास करणे टाळावे. आपली औषधे कायम सोबत ठेवा. तसेच प्रवासादरम्यान प्रेग्नन्सीचे सर्व रिपोर्ट सोबत असणे गरजेचे आहे. प्रवासा अगोदर आवश्यक तपासण्या करून घ्यावा आणि मगच प्रवास करावा.

कोणत्या महिन्यात प्रवास करणे योग्य?

प्रेग्नन्सीमध्ये प्रवास करायचा असल्यास तीन ते सहा महिन्यापर्यंत चा काळ सुरक्षित मानला जातो. या महिन्यांमध्ये महिलेची मनस्थिती उत्तम असते.

आरामदायी प्रवास

गरोदर महिलेने प्रवासादरम्यान कम्फर्टेबल शूज आणि कम्फर्टेबल कपडे घालणे खूप महत्त्वाचे आहे. गरोदर महिलेने प्रवासादरम्यान जास्त जड बॅग सोबत ठेवू नये. अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टी बॅगमध्ये ठेवाव्या.

Travel During Pregnancy
Picnic Spots in Mumbai: मुंबईजवळ हटके पिकनिक स्पॉट, कुटुंबाला घेऊन ५ ठिकाणी नक्की भेट द्या

योग्य ठिकाणाची निवड

महिलेने आपली प्रकृती पाहूनच प्रवासाचे ठिकाण निश्चित करावे. तेथील सुरक्षिततेची तसेच वातावरणाची आधी चौकशी करून घ्यावी. सामान्य सोयी सुविधा तसेच आजूबाजूला रुग्णालय उपलब्ध आहे का याची खात्री करावी. जास्त डोंगराळ भागी किंवा समुद्रकिनारी जाऊ नये.

मार्ग आणि वाहन

प्रवासादरम्यान सर्वात महत्त्वाचा असतो मार्ग आणि वाहन. त्यामुळे यांची अचूक निवड करावी. गरोदर महिलेने सहसा स्वतःच्या प्रायव्हेट गाडीतूनच प्रवास करावा. खराब रस्त्यावरून गाडी चालवणे सहसा टाळावे.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Travel During Pregnancy
Indian Railway: विविधतेने नटलेला प्रवास अन् उत्तम सुविधा; कशी आहे देशातील सर्वात लांब ट्रेन? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com