Doctors Day 2024 : दरवर्षी डॉक्टर डे १ जुलै रोजी का साजरा करतात? वाचा काय आहे कारण

Doctor Day 2024 News : १ जुलैनिमित्त भारतात डॉक्टर डे सेलिब्रेट केला जात आहे. प्रत्येक देशात डॉक्टर डे विविध दिवशी साजरा केला जातो. मात्र भारतामध्ये आजच हा दिवस साजरा करतात.
Doctor Day 2024 News
Doctors Day 2024Saam TV

या सृष्टीत सर्वात श्रीमंत कोण असं विचारलं तर आपण नेहमी स्वस्त:चं नाव घेतो. कारण प्रत्येक व्यक्तीकडे असलेलं निरोगी जीवण हेच त्यांची श्रीमंती ठरवतं. निरोगी व्यक्ती आपलं आयुष्य फार चांगल्या पद्धतीने जगू शकतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात डॉक्टर महत्वाची भूमिका बजावतात. छोटे-मोठे असे सर्वच आजार डॉक्टरांमुळे बरे होण्यास मदत होते. त्यामुळेच डॉक्टरांना सर्वत्र देवाचा दर्जा दिला जातो.

Doctor Day 2024 News
Bogus Doctor : दहावी नापास बनला डॉक्टर; धुळ्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांनी तीन ठिकाणी टाकले छापे

अशात आज १ जुलैनिमित्त भारतात डॉक्टर डे सेलिब्रेट केला जात आहे. प्रत्येक देशात डॉक्टर डे विविध दिवशी साजरा केला जातो. मात्र भारतामध्ये आजच हा दिवस साजरा करतात. त्यामागचं कारण काय आहे? याची माहिती या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

१ जुलै १८८२ मध्ये भारताचे प्रसिद्ध फिजीशियन डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म झाला होता. तसेच त्यांचं निधन सुद्धा १ जुलै १९६२ रोजी झालं होतं. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात भरपूर काम केलंय. तसेच मोठं नाव कमवलं आहे. त्यामुळे १ जुलै हाच दिवस भारतात डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो.

डॉक्टर डे २०२४ ची थीम

प्रत्येक वर्षी शासनाकडून डॉक्टर डेसाठी विविध थिम ठरवल्या जातात आणि सेलिब्रेट केलं जातं. या वर्षी २०२४ मध्ये डॉक्टर डे निमित्त "Healing Hands, Caring Hearts" अशी थीम ठरवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा अशा पद्धतीच्या थीमने डॉक्टर डे साजरा केला जात आहे.

डॉक्टर आपल्या जीवनात फार महत्वाची भूमिका बजावतात. कोरोनाकाळात अनेक डॉक्टरांनी रात्रंदिवस काम केलं आणि लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. साथिचे विविध आजार आल्यावर देखील डॉक्टर घरात बसून न राहता काम करतात आणि सामान्य नागरिकांचा जीव वाचवतात.

Doctor Day 2024 News
Celebrities Who Won Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत सेलिब्रिटींचा दबदबा; कोणत्या जागेवरून कोणता तारा चमकला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com